Tuesday, May 5, 2020

" मला तर वाटतं "

काय दिवस आलेत कळतच नाही.
चुकी कोण करतो आणि भोगतो कोण.
कशाचा काशाशीच संबंध नाही .

सगळेच बसले आहेत घरात.


भीती मरणाची इच्छा जगण्याची आहे ना यामागे .
जीवनाचाच हो खेळ झाला .
माहीत नाही जायचा कुणाचा आता वेळ झाला .
तरीही आशा आहे भविष्याची.
आस आहे जगण्याची .
इच्छा आहे काही करण्याची.
नियतीचा आहे हा खेळ .
जगणे मरणे त्याच्या हाती.
मलाच मी बघतो आता माझ्यासाठी.
दूरवर दिवा ना अजूनही जळतोय.
सांगतोय.....
मी विझणार नाही ....
आणी विझलो तरीही  पहाटेला सूर्य उगवणार आहेच
परत प्रकाशाची किरणं घेऊन...
आणी सर्व प्रकाशमान होणार आहे.
जीवन हे असेच चालणार आहे.
आम्ही सारे या जीवनाचे स्तंभ आहोत.
आम्हीही जगणार आहोत जगवणार आहोत.
Sanjay R.


Monday, May 4, 2020

" वाट पाहू पावसाची "

सरली रात्र आणि 
झाली कशी पहाट ।
आज सूर्याचा दिसतो
काही वेगळाच थाट ।

सकाळ पासूनचा क्रोध
उष्ण करून गेला वारे ।
झाली धरती तांबडी
अंग निघते भाजून सारे ।

गारवा  सारून गेला
थेंब पाण्याचा सुकून गेला ।
निरभ्र झाले आकाश
ढगही दूर उडून गेला ।

वाट पाहू पावसाची
क्रोध सूर्याचा जाता ।
फुलेल हिरवळ सारी 
ढग आकाशी येता ।
Sanjay R.


Sunday, May 3, 2020

" माझ्या दाताचे दुखणे "

कुणास ठाऊक, किती दिवस चालणार हा लॉक डाऊन. आज 3 मे, परत 17 तारखे पर्यंत समोर ढकलण्यात आला. घरात बसून बसून कंटाळा आला. आज तीन दिवस झाले दाताचे दुखणे वाढतच चालले. वाटलं होतं 3 ला लॉक डाऊन सम्पेल आणि मग बिनधास्त डॉक्टर कडे जाऊन उपचार करून घेऊ. पण लॉक डाऊन तर परत वाढला आता 17 पर्यंत तर दुखणे थांबवून ठेवणे खूपच कठीण आहे. सो डॉक्टरांचा नम्बर शोधला आणि कॉल केला. नशीब अटेंडन्ट ने फोन उचलला. मी माझा परिचय दिला आणि अपॉइंटमेंट मागितली. तिने थोडे थांबायला सांगितले आणि ती डॉक्टरांना विचारायला गेली. थोड्याच वेळात तिने मला एक वजता यायचे सांगितले. खर्च खूप बरे वाटले. अर्धे दुखणे तर माझे तिथेच कमी झाले.
कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे मला शंका वाटत होती. डॉक्टर वेळ देतील की नाही. देतील तर काय फक्त पेन किलर देऊन काही दिवस थांबायला सांगतील का. की इलाजच करणार नाहीत. कोरोना ची भीती ने तर सारे जग घरून होते. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती होती. पण डॉक्टरांनी होकार दिल्याने खरेच माझे अर्धे दुखणे थांबले होते.
मी डॉक्टर कडे जाऊन आलो. त्यांनी पूर्ण चेक अप करून मला औषध दिले . आणि परत पाच दिवसांनी येण्याचे सांगितले.
औषधांचा पहिला डोज घेताच माझे दुखणे पूर्ण पणे कमी झाले होते. आणि लक्षात आले की माझे दुखणे हे माझ्या दातांच्या दुखाण्यापेक्षा मनात असलेल्या भीतीचेच जास्त होते.  
माझ्या या सध्या दुखण्याने मला किती टेन्शन आले होते. आणि खरच या लॉक डाऊन चे वेळी जे मोठ्या आजाराला सामोरे जात असतील त्यांची अवस्था काशी असेल.  खरच तो विचारच नको वाटतो. आणि कर्तव्य निष्ठ सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करावेसे वाटते.
Sanjay R.


 

Saturday, May 2, 2020

" लोकल मधली पॉकेटमारी "

आज ऑफिसला जायचा मुडत नव्हता पण, घरात बसून सुट्टी घालवणे म्हणजे फारच कठीण कार्य होते . म्हणून ऑफिसला आलो, विचार केला चला आज साईट वर जावं म्हणून ऑफिसमधून स्टेशनवर लोकल पकडून साईटवर पोचलो, साईटवर काम संपन्याच्या मार्गावर पोचले होते. कॉम्प्लिशन रिपोर्ट बनवणे सुरू होते. बॅलन्स मटेरियल ची लिस्ट बनवायला सांगून मी बाकी कामाचा आढावा घेतला सगळ्यांना कामाचे निर्देश दिलेत आणि साईटवरचे काम आटपून परत निघालो. परत लोकल पकडावी म्हणून स्टेशनला आलो. वेळ दुपारची असल्या कारणाने स्टेशनला गर्दी कमीच होती. मला त्यातल्या त्यात हार्बर लाईन ची ट्रेन पकडायची असल्याने तिकडे तर मुळीच गर्दी नव्हती. ट्रेन आली तशी दोन तीन लोक फक्त उतरले.  आणि मला धरून फक्त दोनच लोक गाडीत चढलो पूर्ण ट्रेन रिकामी होती. एखाद दोन लोक आत बसलेले होते.
असा मी दरवाजा जवळ एका बाजूने उभा झालो आणि माझ्या सोबत चढलेला मनुष्य जो माझ्या अनोळखी होता तो माझ्या पुढच्या बाजूने उभा झाला. ट्रेन खाली असल्याने मी पण बिनधास्त पणे उभा होतो. पुढल्या स्टेशनला गाडी थांबली आणि एकदम वादळ यावं तशी बरीच गर्दी डब्ब्यात घुसली.  त्यात थोडी धक्का बुक्की पण झाली पण त्यानंतरच्या स्टेशनवर ती सम्पूर्ण गर्दी खाली झाली आणि माझ्या सोबत चढलेला तो व्यक्ती आणि मी परत दोघेच डब्यात उरलो होतो. ट्रेन सुरू झाली.
खाली काही कागद पडलेले दिसत होते. बाजूला एक रिकामे पाकीट पडलेले होते. खाली बघितल्यावर सहज लक्षात येत होते की काही क्षणा आगीदर झालेल्या गर्दीत कुणीतरी कुणाच्या पाकिटावर हात साफ केला आहे.
माझ्या सोबत चढलेल्या त्या वयक्तीने तशी शंका बोलून दाखवली. ती म्हणाला बघा कुणाचं तरी पाकीट मारलं हो. गरिबाचे पैसे गेले बघा. आणि खाली वाकून त्याने ते खाली पडलेले कागद हातात घेतले. ते कागद वाचताच तो जागीच उसळला. मी पण माझ्या मागच्या खिशात हात लावून माझे पाकीट जागेवर असल्याची खात्री करून घेतली .
पण माझ्या सोबत चढलेला तो व्यक्ती मात्र हळहळ व्यक्त करत होता. ते पाकीट त्याचेच होते आणि गर्दी चा फायदा घेत कुणीतरी त्याचे पाकीट साफ केले होते.
मात्र त्या वयक्तीच्या खिशात जास्त पैसे नसल्याचे सांगून तो व्यक्ती मात्र खूप वाचलो या भावनेने शांत भासत होता .
Sanjay R.



" परी तू लाडकी बाबांची "

परी तू लाडकी बाबांची
सर्वस्व ग तूच आईची
वेडी लाडी  ग तू  ताईची
बंध अंतरातला तू दादाची

प्रिया किती तू सगळ्यांची
छकुली गोड तू घरच्यांची
परी ती लाडकी बाबांची
Sanjay R.