Saturday, May 2, 2020

" लोकल मधली पॉकेटमारी "

आज ऑफिसला जायचा मुडत नव्हता पण, घरात बसून सुट्टी घालवणे म्हणजे फारच कठीण कार्य होते . म्हणून ऑफिसला आलो, विचार केला चला आज साईट वर जावं म्हणून ऑफिसमधून स्टेशनवर लोकल पकडून साईटवर पोचलो, साईटवर काम संपन्याच्या मार्गावर पोचले होते. कॉम्प्लिशन रिपोर्ट बनवणे सुरू होते. बॅलन्स मटेरियल ची लिस्ट बनवायला सांगून मी बाकी कामाचा आढावा घेतला सगळ्यांना कामाचे निर्देश दिलेत आणि साईटवरचे काम आटपून परत निघालो. परत लोकल पकडावी म्हणून स्टेशनला आलो. वेळ दुपारची असल्या कारणाने स्टेशनला गर्दी कमीच होती. मला त्यातल्या त्यात हार्बर लाईन ची ट्रेन पकडायची असल्याने तिकडे तर मुळीच गर्दी नव्हती. ट्रेन आली तशी दोन तीन लोक फक्त उतरले.  आणि मला धरून फक्त दोनच लोक गाडीत चढलो पूर्ण ट्रेन रिकामी होती. एखाद दोन लोक आत बसलेले होते.
असा मी दरवाजा जवळ एका बाजूने उभा झालो आणि माझ्या सोबत चढलेला मनुष्य जो माझ्या अनोळखी होता तो माझ्या पुढच्या बाजूने उभा झाला. ट्रेन खाली असल्याने मी पण बिनधास्त पणे उभा होतो. पुढल्या स्टेशनला गाडी थांबली आणि एकदम वादळ यावं तशी बरीच गर्दी डब्ब्यात घुसली.  त्यात थोडी धक्का बुक्की पण झाली पण त्यानंतरच्या स्टेशनवर ती सम्पूर्ण गर्दी खाली झाली आणि माझ्या सोबत चढलेला तो व्यक्ती आणि मी परत दोघेच डब्यात उरलो होतो. ट्रेन सुरू झाली.
खाली काही कागद पडलेले दिसत होते. बाजूला एक रिकामे पाकीट पडलेले होते. खाली बघितल्यावर सहज लक्षात येत होते की काही क्षणा आगीदर झालेल्या गर्दीत कुणीतरी कुणाच्या पाकिटावर हात साफ केला आहे.
माझ्या सोबत चढलेल्या त्या वयक्तीने तशी शंका बोलून दाखवली. ती म्हणाला बघा कुणाचं तरी पाकीट मारलं हो. गरिबाचे पैसे गेले बघा. आणि खाली वाकून त्याने ते खाली पडलेले कागद हातात घेतले. ते कागद वाचताच तो जागीच उसळला. मी पण माझ्या मागच्या खिशात हात लावून माझे पाकीट जागेवर असल्याची खात्री करून घेतली .
पण माझ्या सोबत चढलेला तो व्यक्ती मात्र हळहळ व्यक्त करत होता. ते पाकीट त्याचेच होते आणि गर्दी चा फायदा घेत कुणीतरी त्याचे पाकीट साफ केले होते.
मात्र त्या वयक्तीच्या खिशात जास्त पैसे नसल्याचे सांगून तो व्यक्ती मात्र खूप वाचलो या भावनेने शांत भासत होता .
Sanjay R.



No comments: