Thursday, May 28, 2020

" शब्दांना असती पंख "

शब्दांना असतात पंख
जातात दूर ते वाऱ्यासंगे 
अंतरात करतात घर
चर्चाही त्यावर खूप रंगे 

आघात शब्दांचा हृदयावर
घेई दुःख तिथे आकार 
सहज कधी निघती शब्द
अर्थ तयाचे ते निराकार

कधी चकमक होई शब्दांची
शब्दाने शब्द मग वाढे 
राग द्वेष मोह मत्सर गुण सारे
अवतरती शब्दातून सारे तिढे 

माया ममता प्रेमाचे दर्शन
जाती शब्द सारेच सांगून 
भाव भक्तीचा शब्दातून येता
भक्तही जाई भावनेत रंगून ।
Sanjay R.

No comments: