Saturday, October 19, 2019

" सांगा कसं करायचं "

कधी आठवायचं
कधी विसरायचं
कळतच नाही ना
काय कसं करायचं ।
सांगा कसं वागायचं
कानांनी ऐकायचं
डोळयांनी बघायचं
पटेल मनाला तेच
फक्त करायचं ।
दुःखाला सरायच
आनंदाला घ्यायचं
जीवन हे अनमोल
आहे ना जगायचं ।
Sanjay R.

Thursday, October 17, 2019

" मन विचारात आहे अंतरात "

मन असते कुठं
खूप खोल अंतरात ।
मन असतं कसं
सूक्ष्म की विशाल ।
मात्र असत ते
नेहमीच विचारात ।
क्षणात इथे तर
क्षणात तिथे ।
स्वतः माणूस पोचणार नाही
आधीच ते पोचते तिथे ।
कधी साक्षात
तर कधी स्वप्नात ।
फिरून फिरून
येईल परत अंतरात ।
तिथूनच घेईल झेप
दूर अंतराळात ।
नसेल जीथे मर्यादा
विचार मनाचे अमर्याद ।
न भाषा न शब्द
नसते कधीच स्तब्ध ।
जीवनाचा चाले विचार
हेच मनाचे प्रारब्ध ।
Sanjay R.

Tuesday, October 15, 2019

" मन किती हे वेडं "

मन किती हे वेडं
धावते पुढं पुढं ।
चाल त्याची दुड दुड
नाही थांबत थोडं ।

पुढे नाविण्याचं घोडं
मनी कुतुहलाची खोड ।
शोधी साऱ्यावर तोड
मिरवी मीच मोठा लोड ।

करी कधी धर सोड
चाले मनात तोडफोड ।
दुःखाला आनंदाची जोड
वाटे मग सारेच गोड ।
Sanjay R.

" चार ओळी "

चार ओळी

(1)
जंजिर से बांधे
वह कैद होती है ।
बंधन हो दिलका
वह तो प्यार होता है ।

(2)
बंधन एक धागेका
तुटता है जरूर ।
दिल तूट जाये तो
कहेना दिलका कसूर ।

(3)
असेल शब्द तीक्ष्ण हत्यार
करतही असतील ते घायाळ ।
पण तितकीच ताकद त्यांची
बघा बोलून थोडे मधाळ ।

(4)
शांतता असतो
एक संकेत वादळापूर्वीचा ।
हवे कशाला वादळ
नकोच त्रास मग शांततेचा ।
Sanjay R.

Monday, October 14, 2019

" शरद पौर्णिमा "

निघाला चंद्र जेव्हा
भ्रमणाला आकाशात ।
खुदकन हसली चांदणी
गोड कशी गालात ।

मात्र चंद्र होता तेव्हा
आपल्याच नादात ।
दिवस शरद पौर्णिमेचा,
सारेच किती आनंदात ।

निरखत होता चंद्र
रूप चांदणीचे दुधात ।
दुधाचे झाले अमृत
हसली चांदणी गालात ।
Sanjay R.