अस्त्र शस्त्राची पूजा करायचे
बंध मैत्रीचे घट्ट बांधायचे
आयुष्याला झळाळी पिवळी
सुवर्णाची द्यायचे ।
निशाण विजयाचे उंच
आकाशी फडकवायचे ।

झाला गाव सुना
पाखरांनो या ना पुन्हा
झाला गाव सुना ।
नाही कावळा नाही बगळा
चिऊला पण नाही दाना
झाला गाव सुना ।
झाडे झुडपे गेली खंगून
काय कुणाचा यात गुन्हा
झाला गाव सुना ।
लोपली हिरवळ सारी
नाही उरला गाव जुना
झाला गाव सुना ।
आटले पाणी नदीचे
येईल तिलाच पूर पुन्हा
झाला गाव सुना ।
घरटे तुटून राख झाले
गेला कुठे इथला कान्हा
झाला गाव सुना ।
माणूस माणूस नाही उरला
शोधते आई तिचा तान्हा
झाला गाव सुना ।
तुळस अंगणी वाट पाहते
वाकून गेल्या साऱ्या माना
झाला गाव सुना ।
भकास झाले सारे गाव
कुणीतरी हो परत याना
झाला गाव सुना ।
Sanjay R.
आलं हे इंटरनेट
घुसलं घरात थेट ।
पाहिले थोडा जास्त
होता त्याचा रेट ।
म्हणालं होतो स्वस्त
करा थोडं वेट ।
दिवसाला एक जीबी
जिओ ने दिली भेट ।
मोबाईलच झाला आता
सर्वांचाच पेट ।
सुटता सुटत नाही
बंद झालेत गेट ।
चालणे बोलणे हसणे रडणे
साऱ्यांनाच हवे इंटरनेट ।
व्हर्चुअल चा जमाना
इथेच होतो मेट ।
Sanjay R.
मंत्र देऊन अहिंसेचा
केला सत्याग्रह स्वातंत्र्याचा ।
बापू तुम्ही महान किती
झालात राष्ट्रपिता या देशाचा ।
चालवली चळवळ स्वदेशीची,
प्रसार प्रचार केला खादीचा ।
अस्पृश्यता आणि स्वच्छता
बिमोड केला जातीयतेचा ।
प्रेरणा स्थानी तुम्हीच बापू
दिला कण कण आयुष्याचा ।
पाळायचे तत्व जे सांगितले तुम्ही
मार्ग खरा हाच जीवनाचा ।
Sanjay R.
बघतो डोळ्यात
तुझ्या मी स्वप्न ।
पण विसरलोच
कसे ते जपणं ।
कळते व्याकुळता
तुझ्या डोळ्यातली ।
सांगू कसा तुज
व्यथा मनातली ।
चंद्र नाही दूर पण
बघतो अंगणातून ।
अंतरात बघ माझ्या
नाही जाणार मनातून ।
Sanjay R.