करा ना रोज योग
पळतील दूर सारे रोग ।।
आळस आमचा कारण
आजार नाही भोग ।।
लक्ष थोडे देऊन आता
टाळा पैशाचा दुरुपयोग ।।
लाभेल आनंद उत्साह
करा कुटुंबासी सहयोग ।।
Sanjay R.
करा ना रोज योग
पळतील दूर सारे रोग ।।
आळस आमचा कारण
आजार नाही भोग ।।
लक्ष थोडे देऊन आता
टाळा पैशाचा दुरुपयोग ।।
लाभेल आनंद उत्साह
करा कुटुंबासी सहयोग ।।
Sanjay R.
काय कशाची शान
नाही कुणाचा मान ।
अर्जित केले ज्ञान
परी विसरलो भान ।
घेऊन सर्वस्वाची आन
होण्यास खूप महान ।
म्हणावे कुणी छान
घातले पालथे रान ।
घेऊनि काही दान
घेतले आपलेच प्राण ।
झालो दहशतवादी
हाती हिंसेचे निशाण ।
Sanjay R.
का रे पावसा तुने
केला असा घात ।
सांग जरा यात
कुणाचा रे हात ।
सरला एक महिना
वाट तुझी पाहण्यात ।
करून पेरनी सारी
नाही काहीच शेतात ।
नजर लागली भिरभिर
ढग नाही आकाशात ।
चिंता सारीच आता
आली आसवं डोळ्यात ।
Sanjay R.
नसेल पिण्यास पाणी
होईल पृथ्वीचा अंत ।
पाण्यासाठी युद्ध
नसेल कुणास खंत ।
एकमेका मारतील
वाचविल कोण संत ।
विनाश सृष्टीचा होता
अंताचा होईल अंत ।
Sanjay R.
हाल लय आता बेकार
न्हाई पावसाले धार ।
काय अभायाचा इचार
खाली खाली दिशा चार ।
उनाचा झेलतो मी मार
पाहू कोनाचा अधार ।
अंतरात होते वार ।
करा मले तुमी सार ।
Sanjay R.