एक थेंब पाणी
सूर्याची ही कहाणी ।
सुकले नदी नाले
मिटली का निशाणी ।
हंडा घेऊन हाती
चला जाऊ अनवाणी ।
ओसाड झाले गाव
नाही उरला कोणी ।
पेटली आग आता
मिटते बघा पापणी ।
हवे मजला आता
एक थेंब पाणी ।
Sanjay R.
Friday, April 26, 2019
" एक थेंब पाणी "
Thursday, April 25, 2019
" वणवा पेटला "
झळा उन्हाच्या कशा या
अंग अंग निघते भाजून ।
नाही उरले झाड कुठेच
उभा उन्हातच मी अजून ।
शोध घेतला पाखरांचा
चिमणी पण नव्हती कुठे ।
पाण्यावाचून सांगा कसे
जंगलही झाले सुटे ।
वाळून गेलीत झाड सारी
उडताहेत पानं दूर दूर ।
मधेच एक ढग दिसतो
त्यात बघतो पावसाचा पूर ।
कोरडी पडली जीभ आता
पेटला वणवा त्या दूर ।
थेंब भर पाण्यासाठी
जीव झाला कसा आतुर ।
Sanjay R.
Wednesday, April 24, 2019
" उरली फक्त राखड "
वाट मनाची वेडी वाकडी
आहे किती ती अवघड ।
निघतो चालाया मी जेव्हा
होते जीवाची तडफड ।
एक एक पाऊल ठेवता
होते किती ती पडझड ।
चाललो उठून मी परत
करे छाती मग धडधड ।
गेली जाळून सारी स्वप्न
आता उरली फक्त राखड ।
उचलाया नाही कोणी
देईल हवाच तिला पाखड ।
Sanjay R.
Tuesday, April 23, 2019
" डोळे "
जेव्हा मी ना
बघतो तुझ्या डोळ्यात ।
थांबतो श्वास
मधेच माझ्या गळ्यात ।
ठेवतो तुझी छबी
मग मी माझ्या डोळ्यात ।
बघतो मिटून डोळे
तुलाच मी माझ्या स्वप्नात ।
Sanjay R.
Monday, April 22, 2019
" सूर्याचा तिढा "
उन्हाचा जोर बघा
कमी झाला थोडा ।
आभाळानं वेढलं
सावलीचा सडा ।
बरं वाटत जरा
नाही सूर्याचा तिढा ।
गर्मी पाई तर होतो
माणूस चिडचिडा ।
Sanjay R.