अकेले अकेले लहरोके संग
देखो ये हवा करती है तंग ।
उमड पडी दिलमे उमंग
चल उड चले अब संग संग ।
Sanjay R.
Sunday, April 21, 2019
" जिंदगी "
Saturday, April 20, 2019
" सूर्य चंद्र "
लागले ग्रहण सूर्याला
बघायचे मज चंद्राला ।
सळ सळ जरी वाहे तो
अस्तित्व कुठे वाऱ्याला ।
उमलला गुलाब अंगणात
डोलतो कसा डौलाने ।
धुंद झाले अंगण सारे
मंद धुंद सुगंधाने
स्वप्नच देतात साद मनाला
बंद असतात डोळे जेव्हा ।
अवतरतो मग सूर्य धरेवर
होते तांबडे आकाश तेव्हा ।
Sanjay R.
" तूच तू "
निरागस तू
मनोहार तू ।
वाटे मजला
आधार तू ।
आचार तू
विचार तू ।
फुलांचाच
बहार तू ।
गंध तू
सुगंध तू
विचारांचा
बंध तू ।
स्वप्नात तू
नेत्रात तू
बघतो जिथे
अंतरात तू ।
Sanjay R.
Friday, April 19, 2019
" मन "
मन सुखाचा सागर
कुठला त्यास किनारा ।
हळूच एक फुंकर यावी
होऊन जावे वादळ वारा ।
आकाशात ढग यावेत
सोबतीला पावसाच्या धारा ।
काळोखाची चादर ओढून
बघतो त्यातून लखलख तारा ।
पहाटेचे तांबडे फुटता
प्रकाश होतो आसमंत सारा ।
प्रीतीचा हा बंध नाजूक
अंतरात त्याचाच इशारा ।
Sanjay R.
Thursday, April 18, 2019
" राणी "
स्त्री असते सुंदर ज्ञानी
रंग रूप निर्मळ पाणी
शूर वीर ती लक्ष्मी राणी
नका समजू अबला कोणी
Sanjay R.