Wednesday, April 17, 2019

" साथी "

'तेरी हर अदा
मुझे खूप भाती है ।
तुम दूर हो मगर
सपनो की साथी है ।

सोचता है जब
मेरा यह दिल ।
याद तुम्हारी ही
तो आती है ।

भूल न जाना कभी
तुम्ही हो एक ।
जो मुझको रात दिन
सताती है ।
Sanjay R.

" काय नाव देऊ "

डोळ्यात तुझ्या बघून
सुचतात चार शब्द ।
आतुर होते मन आणि
हृदय होते स्तब्ध ।

नाव काय देऊ सांग
तुझ्या माझ्या नात्याला ।
अथांग हा सागर किती
उभा मी या काठाला ।

अंतरात उठले वादळ
थरथर होते शब्दांची ।
शब्दांचीच झाली कविता
बघ तुझ्याच आठवांची ।
Sanjay R.

Tuesday, April 16, 2019

" गंध "

दार मनाचे होते बंद
मन मात्र बेधुंद ।
वाटे मनास फार
कसा हा छंद ।
पाकळीला कधी
असतो का गंध ।
उमलू दे फुल
पसरू दे सुगंध ।
उठू दे दरवळ
मंद मंद ।।
Sanjay R.

" आस "

तुझेच वेड मज
हे का कसे लागले ।
करतो विचार तुझाच
मन तुझेच जाहले ।

ओढ अंतरात तुझी
आस तुझ्या भेटीची ।
हरली तहान भूक
उरली तूझ्या प्रीतीची ।

शब्दात तुझ्या शोधतो
माझा मीच कुठे आहे ।
आभास जेव्हा होतो
हृदयात तू माझ्या आहे ।
Sanjay R.

Monday, April 15, 2019

" तारीफ "

ये दिल क्या कहता है
मैं सोचू कुछ और ।
करता कुछ और पर
चाहता दिल कुछ और ।

'तेरी तारीफ मे कही
शब्द मेरे कम ना पडे ।
हर अदा तुम्हारी क्यू
दिलको हमारे छेडे ।

आपमें वो जादू है
चाहे जो हमे बना दो ।
बस पनाह दिलमे देना
और ईश्कमे खो जाने दो ।

दिल तो है एक परिनदा
आसमान छुने की आस ।
पल भर मे जब लौट आये
देखो चल रही है सास ।
Sanjay R.