Thursday, March 21, 2019

" चाल ना बावा "

नागराचं हाये वावर
चाल ना बावा ।
न्हाई उन्हाची फिकीर
तू म्हनशीन तवा ।
वली होईन माती
घाम गळन जवा ।
येईन पीक  जोमानं
आटन रगत तवा ।
पैका येईन हाती
घेऊ शर्ट नवा ।
पयले आना लागन
माय साठी दवा ।
पाहू मंग सपन
चाल ना बावा ।
Sanjay R.

Wednesday, March 20, 2019

" शेतकऱ्याचं जीनं "

सुकले झाडं
वायले पानं ।
शेतकऱ्याचं
एकच गानं ।
रडते बिचारा
काय त्याचं जीनं ।
पिकवून सारं
सावकाराले देनं ।
फाटक फुटक
सोताले घेनं ।
चिल्लावला कितीबी
तरी होनं ना जानं ।
मुकाट्यानं सोसते
आपलं जीनं ।
Sanjay R.

" आली होळी आली "

ये ना गं सखे
आली होळी आली ।
रंग गुलाबी
लावायचा तुझ्या गाली ।
भिजवून रंगात
करील पिचकारी खाली ।
आली होळी आली
भिजून रंगात रंग तू झाली ।
Sanjay R.

Monday, March 18, 2019

" गर्मीचा कहर "

सुरू झाला आता
गर्मीचा कहर ।
पाळासाला आला
फुलांचा बहर ।
तापून किती निघतय
गाव आणि शहर ।
कोरडे ठण ठण
नद्या आणि नहर ।
पाण्याविना होईल
आयुष्य जहर ।
Sanjay R.

Friday, March 15, 2019

" दूर किती तू "

धडधडते हृदय माझे
सळसळतो वारा ।
होता आठवण तुझी
चमचमतो तारा ।

दूर किती तू आहेस
त्या पर्वतांच्या पल्याड ।
अंतरास मात्र वाटे
इथेच तू पापणीच्या अल्याड ।
रिमझिम रिमझिम होते जेव्हा
पावसाची बरसात ।
बेधुंद होऊन घेतो भिजून
हातात तुझाच हात ।

ठेवले मी डोळ्यात जपून
नजरेचे ते इशारे ।
वाटेवर तुझ्याच थांबले
माझे श्वास सारे ।

करू नकोस उशीर आता
प्राण माझे कंठाशी आले ।
जगेलं कसा तुझ्याविना मी
स्वप्न माझे तूच झाले ।
Sanjay R.