Wednesday, February 27, 2019

" लय झाली अमिरी "

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गाड्याच्या
जाऊन थोडं राहा ।

न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।

बिमार बुढी कोपऱ्यात
न्हाई औषीध पानी ।
जिरून गेली जागीच
कायजी कोनाले कानीं ।

नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।

शिक्षन पानी लेकरायचं
खिशात न्हाई खडकू ।
लक्षुमी त्याची रडते
मानते गुमान ऱ्हावा
नका अशे भडकू ।

पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।

सरनाले बी त्याच्या
लाकडं कसे भेटन ।
पाला पाचोया जमवून
सांगा देह कसा पेटंन ।

मुन मनतो गडया .....

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गाड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
Sanjay Ronghe
Nagpur

Tuesday, February 26, 2019

" झटका पाकिस्तानले "

पाकिस्तान ले बापू
आज दावला इंगा ।
सांगून ठिवतो
घेऊ नका पंगा  ।
कश्मीर मंदी
लय झाला दंगा  ।
घरात घुसून
कसा केला नंगा ।
झोंबली का न्हाई
लवकर सांगा ।
Sanjay R.

" वेडा रे वेडा "

करायचं  काव्य
वाचायचा धडा ।
काढायची रांगोळी
त्यावर शेणाचा सडा ।
जायचं असतं हळू
धावतो तुफानी घोडा ।
जुळलेलं सारच
हातोडीनं तोडा ।
समुद्र भरायला
पाणी थेंब थेंब सोडा ।
अंथरुणात झोपतांना
घालायचा जोडा ।
सगळंच उलटं
कशाला चिडा ।
म्हातारपणीच नेमकं
पाप पुण्य फेडा ।
जीवनच हे
आयुष्याचा राडा ।
जोवर चालतो
दम लावून ओढा ।
पसरा हात
मिळतो पेढा ।
नसेल जगायचं तर
तिरडीवर पडा ।
देऊ लावून आग
संपेल तिढा ।
वेडा रे वेडा
कुणीही छेडा ।
Sanjay R.

Monday, February 25, 2019

प्रगट दिन बाबांचा

शेगावी गजानन बाबा वसले 
अंतरात आमच्या ते ठसले ।
श्रद्धा भक्तीचा लोटतो महासागर 
मनात बाबांचा असतो आदर ।
Sanjay R.

Friday, February 22, 2019

" उपवास "

करायचा कसा उपवास
भरायचा एक एक श्वास ।

अन्नविना मग करायचा
पूर्ण दिवसाचा प्रवास ।

करून परमेश्वराचे चिंतन
अंतरातल्या स्वत्वाचा ध्यास ।

आचार विचारांची शुद्धी
एक आत्मविवेचनाचा प्रयास ।
Sanjay R.