Tuesday, September 18, 2018

" मायेचा सागर "

माय हाये माही मायेचा सागर
लेकरावर तीची भीर भीर नजर ।
सर न्हाई तीची कोणाले
करान कितीबी जागर ।
काळजालेच पहा इचरून
कसा फुटते पाझर  ।
जीवा परस केली तुही कदर
तवा झाला तू रे डगर ।
मोठ्ठा लय होय तू डगर वगर
पर भुलू नको तू माय चा पदर ।
ठिवजो बापू तिच्या मायेचा आदर
मांगनार न्हाई तुले थे तुह जिगर ।
Sanjay R.

Friday, September 14, 2018

" परछाई "

कभी यादे है सताती
तो कभी बाते रुलाती
परछाई तो है वह साथी
आंधी आये या तुफान
या हो तुम कही अंजान
कभी छोडकर नहीं जाती
बस साथ निभाती


देख अंधेरा थोडी घाबराती
पल भर फिर गुम हो जाती
देखकर उजाला फार लौट आती
जन्म का नाता पुरा निभाती
बस वही तो है अपना साथी
परछाई कभी छोड नही जाती
बस साथ निभाती
Sanjay R.


Wednesday, September 12, 2018

" भाकर ठेचा "

भाकर आन ठेचा
संभायुनच खाचा ।
नाई त मंग भौ
होते मोठा लोचा ।
उठ बस होते लय
सुटत न्हाई पिच्छा ।
जिभेचे लय चोचले
तिचीच सारी इच्छा ।
Sanjay R.



Wednesday, September 5, 2018

" जय गुरुदेव "

लहानाचा झालो मोठा
आई बाबा तुमची कृपा ।
शिकलो सवरलो
गुरुजी तुमची कृपा ।
उठतो बसतो जगतो
या समाजाची कृपा ।
लागतो देणें साऱ्यांचे
तेव्हाच मार्ग सोपा ।
Sanjay R.

Sunday, September 2, 2018

" मानुस किती कसा "

मानुस आता कसा
मानूसकीच इसरला ।
स्वार्थापायी सांगा
किती तो बिथरला ।

माणूस माणसाचेच
वढते मांग पाय   ।
नको वाटे त्याले
सख्खे बाप माय ।

मान पान इज्जत अब्रू
ठिवली त्यानं गहान  ।
म्हने ज्ञानी मोठा झालो
हावो मीच महान ।

चोरी चकारी भ्रष्टाचारी
तिकडच त्याच भान ।
लुटारू मी किती मोठा
थेच त्याची शान ।
Sanjay R.