Tuesday, September 18, 2018

" मायेचा सागर "

माय हाये माही मायेचा सागर
लेकरावर तीची भीर भीर नजर ।
सर न्हाई तीची कोणाले
करान कितीबी जागर ।
काळजालेच पहा इचरून
कसा फुटते पाझर  ।
जीवा परस केली तुही कदर
तवा झाला तू रे डगर ।
मोठ्ठा लय होय तू डगर वगर
पर भुलू नको तू माय चा पदर ।
ठिवजो बापू तिच्या मायेचा आदर
मांगनार न्हाई तुले थे तुह जिगर ।
Sanjay R.

No comments: