Friday, September 21, 2018

" लक्षण नाही बरं "

लक्षण माणसाचं ना नाहीच बरं
क्रोध त्याच्या मनातला
जसा आगीचा धग्धगणारा लोट
स्वार्थ इतका बोकाळला की
दिसतं त्याला फक्त त्याचंच पोट
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

कुणी इथे आहेत खूपच मिजाशी
आणि कुणी एक एक दाण्यासाठी
दिवस काढतात फक्त उपाशी
कुठे अन्नाचा चाले नासोडा
तर कुठे कोरभर भाकरीचा तुटवडा
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

उरलाच कुठे आता माणसात सदाचार
भ्रष्टाचार दुराचार व्यभिचार अनाचार
नाहीत फक्त हे लक्षणं चार
सरलेत सारेच माणसातले
आचार आणि विचार
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

चोरी लबाडीत सगळे ध्यान
बुद्धी शुद्धी केली गहाण
ढोंगी बाबां झालेत महान
लुच्चे पुच्चे लफंगे गीरी
झाली आता आमची शान
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं
Sanjay R.


No comments: