Tuesday, September 25, 2018

" गळफास "

मिळुन स्वातंत्र्य आम्हास

झालो स्वतंत्र आम्ही जरी ।

मोजू नका हो दिवस

लोटलेत वर्ष कितीतरी ।


करुनी संशोधन अपार

पोचलो आम्ही मंगळा वरी ।

तरी लक्ष कुणाचे आहे

जगतो पारतंत्र्यात शेतकरी ।


रात्रंदिवस मरेस्तो राबतो

एकही दाना नाही घरी ।

वाट पाहतो चातक होऊन

पडतील कधी पावसाच्या सरी ।


बी बियाणे खते औषधे

होतो असाच कर्जबाजारी ।

एकच पाऊस देतो धोका

गाळून पडते मेहेनत सारी ।


कुणास काय जगतो कसा

किंमत शून्य आहे सरकारी ।

घेऊन गळफास लटकतो जेव्हा

करता करविता तोच हरी ।

Sanjay R.

No comments: