Friday, July 6, 2018

" स्वातंत्र्य "

हे स्वातंत्र्य  विरांनो
किंमत कुणास तुमच्या बलिदानाची ।

उरला इथे स्वैराचार
हीच गोष्ट इथे अभिमानाची ।

गांधी नेहेरु टिळक भगतसिंग
थोर लेकरं तुम्ही या भूमातेची ।

स्वातंत्र्याचे स्वप्न तुमचे
आग लागली पारतंत्र्याची ।

गीत गाता राष्ट्र गाण
वाटे तिरंगा आम्हा महान ।

नाही उरले सारे सरले
बघा किती आता झालो लहान ।

राजकारणात हा देश नासला
आता चिंता उरली खुर्चीची ।

मान सन्मान नाही इमान
वाटे त्यातच त्यांना शान ।

भेद भाव जाती वाद
पेटत आहे सगळे रान ।

मारणे मारणे रोजचेच झाले
करून सोडले इथे स्मशान ।
Sanjay R.

" टाळ मृदंग "

टाळ वाजे चिपळीसंग
थाप घेई मृदंग

पायी बंधूनीया चाळ
नाचतसे संत संग

वारीचा अवघाची रंग
मनी पंढरीचा चंग

कीर्तनाच्या रंगी होतसे दंग
मुखी सारे गाती अभंग

करी गजर नामाचा
डोले सारे अंग

ओढ माऊलीच्या प्रेमाची
मग होईल कशी ती भंग
Sanjay R.


Thursday, July 5, 2018

" पंढरीची वाट "

पाऊले चालली पंढरीची वाट l
ना कसला मोह ना कसला थाट l

घेऊन चालती हातात चिपळ्या l
हरिनामाचा गजर अन् वाजवित टाळ्या l

पायात नसे वहाणा पण डोईवर तुळस l
खांद्यावर पताका त्यात नसे आळस l

मुखी तुम्ही सारे बोला हरी बोला l
  माऊलीच्या ओढीने लगबगीने चला l

नाचत गात होती कसे गुंग l
  पांडुरंगाच्या ओढीने सारे कसे बेधुंद l

एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंध l
नाही कोणी चेला नाही कोणी संत l
Sanjay R.

Monday, July 2, 2018

" काय सांगावं आता "

काय सांगावं आता
कोणाच्या मनातलं काय खरं  ।

मरणाऱ्याची सेल्फी काढणं नाही बरं ।
वर जाच्या आंदीच घुमते लय वारं ।
दिसते मनते वॉट्सअप मंदी खर खरं सारं ।

काय सांगाव आता
ईचारच सरले काहीच नाई खरं ।

सुटले मनतेत भाऊ गावभर चोर ।
माय बापच चोरतींन का आपले पोरं  ।
वरत धाडतेत पडून मार ।

काय सांगाव आता
उघड्या खिडक्या उघडे दारं ।

कायले तोडाचे डोक्याचे तार ।
दिसते थे थे आता पाहावं सार ।
जावं मयतीले टाकावं हार ।

काय सांगावं आता
कोणाच्या मनातलं काय खरं ।
Sanjay R.

Saturday, June 30, 2018

" चलाना राया थोडे भिजायला जाऊ "

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ  ।


आकाशात ढगांनी किती गर्दी केली

भरून गेले आभाळ खाली सावली आली ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।


गार झाला वारा मनी फुलला पिसारा

आठवणींच्या डोहात तुमचाच किनारा  ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ  ।


चमचमली वीज कसा लख्ख झाला प्रकाश

अंतरात बघा कसे भरून आले आकाश  ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।


प्रीत तुमची माझी राया तोडू सारे पाश

येऊ द्या मिठीत मज घेऊ मोकळे श्वास  ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ  ।
Sanjay R .