Saturday, June 16, 2018

रोजची खबर

काश्मीरची ऐकतो रोजच खबर
पावलागणिक सापडेल कबर ।

नाही जिथे युद्धाचे मैदान
नाही कुणाला कुणाचे आव्हान ।

लपूनच होतो तिथे हल्ला
देशद्रोह्यांचा असतो सल्ला ।

त्यातही शिजते राजकारण
झाकतात डोळे पाहून मरण ।

नरम धोरणास कोण घालतो भीक
मत पेट्यांचीच तर काळजी अधिक ।

कितीक झाले सरकारी इशारे
अंकात मोजायचे तिथे मरणारे ।

सांगा कुणी कधी लढणार
भेकडांची कंबर तोडणार  ।

झुकवाल काहो तिरंगा तेथे
बोलघेवडे हे आमचे नेते ।

मरणाऱ्यांची किंमत कुणाला
फौज उभी का फक्त मरणाला ।

का होईल बंद पडतील खंड
राहील हातातच तुमचा दंड ।

उठा थोडे सारे जागे व्हा
घेऊन निर्णय करा स्वाहा ।
Sanjay R.

Friday, June 15, 2018

" कमळ "

सांगू कसं तुला
मनात उठलं रान ।

रूप तुझे मनात भरले
भासे सौंदर्याची खाण ।

गुलाबी ओठ तुझे
नाक डोळे छान ।

हास्य गालावर तुझ्या
सुचते प्रेमाचे गाणं ।

अंतरात तूच माझ्या
जसं कमळाच पान ।
Sanjay R.

Wednesday, June 13, 2018

जीवनाचा सार

काय असेल सांगेल कोणी
जीवनाचा या सार ।
सहजच आला मनात माझ्या
नकळत एक विचार ।

पडलो उठलो परी लढलो
कितीक झेलले प्रहार ।
अंतलाच असा मग इतका
का काळा अंधार ।

मागे पुढे आणि आजू बाजू
दिशा असती चार ।
खाली धरती वर आकाश
मधला मीच का निराधार ।

सुख दुःखाच्या वाटा कितीक
कुठे जायचे नव्हता विचार ।
चालत चालत थकलो आता
थांब जरासा सरला आहे बाजार ।

कुणी कुणाचा कोण लागतो
हसतो फुलतो येतो कसा बहार ।
सांज होता परतून फिरतो
ठेऊन जातो उघडे हे दार ।
Sanjay R.

Friday, June 8, 2018

ढगांची गडगड

चालली ढगांची
नुसती गडगड ।

वाढली छातीत
कशी धडधड ।

बंद बघा झाली
साऱ्यांची बडबड ।

सगळीकडे शांतता
वाऱ्याची सळसळ ।

थेंब पावसाचे
करताहेत तडतड ।

मनात चुकचुकली
पालीची फडफड ।

कोसळली का वीज
झाली तडफड ।

जोर वाढला पावसाचा
घडा भरू दे घडघड ।

देवा शेतं पिकू दे
आभाळ भर ।

शेतकरी राजाला
आता सुखी कर ।
Sanjay R.

Thursday, June 7, 2018

दिवस आले पावसाचे

दिवस आलेत पावसाचे
मनसोक्त त्यात भिजायचे ।

थेंब पाण्याचे मोजायचे
ढगांच्या खाली नाचायचे ।

चमचमत्या विजेला बघायचे
गडगडाट होता पाळायचे ।

कांदा भाजीचे बेत आखायचे
टाकून आलं चहा प्यायचे ।

घेऊन छत्री बाहेर निघायचे
पावसाच्या रंगाला थोडे बघायचे ।

सर्दी खोकल्याला थोडे जपायचे
डॉक्टर ला दूरच ठेवायचे ।

पावसाला एन्जॉय करायचे
आनंदाच्या सोहळ्यात फुलायचे ।
Sanjay R.