Friday, March 23, 2018

" वारा "

भाव भावनांचा हा
खेळ सारा ।
मन मोहुन घेणारा
एक तारा ।
हलकेच स्पर्श करुन
जातो वारा ।
होउन रोमांचित उठतो
देह सारा ।
मनात फुलतो मग
मोर पिसारा ।
Sanjay R.

Wednesday, March 21, 2018

" सत्याग्रह "

पडतो का काही फरक
शांतिपुर्ण या सत्याग्रहानं ।
बळी जातोय शेतकरी
फळफळली किती नेतागिरी
बळिराजा तुझ्या मरणानं ।
Sanjay R.

Wednesday, March 14, 2018

" विचारी आमचा शेतकरी "

आहे लयच विचारी
गरीब आमचा शेतकरी ।

परी खोदुन आहे मोठी
दरी त्याच्या वाटेवरी ।

वरषानु वरषे चालली
असिच त्याची वारी ।

चोरायचाच गराडा आहे
सभोवताल त्याच्या दारी ।

संकटानी घेरले त्यास
पहा दिशा चारी ।

नाही निसर्गाचा साथ
व्यापारीही झाले भारी ।

पडतो पोटाला पिळा
उघडी नागडी मुलं घरी ।

कधी येशील रे धाउन
सांग तु देवा हरी ।

कधी होतिल का जागे
लोकं हे सरकारी ।

तुटेल नाही तर एक दिस
करा कोनितं काहितरी ।

आसवं डोळ्यात थबकले
एकेक दिवस जातो भारी ।
Sanjay R.

Monday, March 12, 2018

" उन्हाच्या झळा "

निळ्या निळ्या आकाशात
सुर्याचा एक टिळा ।
गर्मीनं त्याच्या निघतो
भाजुन सारा हुळा ।
चिंब जातो भिजुन देह
होतो निळा काळा ।
आटते पाणी रक्ताचे
तहानेनं व्याकुळ गळा ।
सावलीची माया कशी
लागते धाप सोसताना कळा ।
Sanjay R.

Saturday, March 10, 2018

" उन सावली "

उन्हाळ्यातला एक दिवस
पावसाची झलक दाखवुन गेला ।
आता तर नुसता
महिना मार्चच सुरु झाला ।

हळु हळु सुर्य बघा
लागला किती तापायला ।
आज कसा हा दिवस
उन सावलीचा खेळ सुरु झाला ।

ढगांनी आकाशात
गलबला केला ।
बघुन सुर्य ही सारं
ढगा आड झाला ।

पावसाच्या थेंबांना
उत्साह थोडा आला ।
आ वासलेली धरा
जिव तिचा विसावला ।

कण नी कण धुळीचा
मनसोक्त न्हाला ।
उरली सुरली पानं झाडांची
सरसावली पाणी प्यायला ।

पशु पक्षी झाडे झुडपे
लागले सारे डोलायला ।
उष्ण होउन वाहणारा
वाराही कसा शांत झाला ।
Sanjay R.