Wednesday, February 14, 2018

हसी तेरी

तेरी हर अदा
मुझे खुप भाती है ।
और हसी तेरी
खुप लुभाती है ।
हर वक्त हर लम्हा
याद तेरी सताती है ।
©Sanjay R.

Friday, February 9, 2018

" प्रस्ताव "

कळला मला तुझ्या
प्रेमाचा गं प्रस्ताव ।

म्हणुन तर आलो मी
करुन धावा धाव ।

मनात माझ्या आता
तुझ्या प्रेमाची हाव ।

फुलला गुलाब लाल
सुकले काट्यांचे घाव ।
© Sanjay R.

Thursday, February 8, 2018

" नाचरे मोरा "

प्रत्येेकाची एक
वेगळीच तर्हा ।
म्हणतो कुणी
ब्याग भरा ।

कुणी म्हणतो
जगुन घ्याना जरा ।
कळतच  नाही
कोण खरा ।

विचार मनाचा
थोडा तर करा ।
बाकी आहे खूप
हसाना जरा ।

अविचारांना थोडं
दुर सारा ।
नेहमीच नसतोना
वादळ वारा ।

जिवनात सुख दुखाचा
चालायचाच फेरा ।
त्यलाही दाखवायचा
आपला तोरा ।

गुंफुन फुलांना
सुंदर होतोना दोरा ।
दरवळतो सुगंध
नाचरे मोरा ।
© Sanjay R.

Wednesday, February 7, 2018

" नाव मायं सबिना "

नाव मायं सबिना
कोनी मले काइ मना ।
आज सांगतो तुमाले
आमच्या मिया बिबिचा रोना ।

रोज रोज माया
जिवनात हाये.ना थेच ।
पिसायला जिव महा
झालं आता लैच ।

दरसाल रायते माया
कडिवर एक मुल ।
आनं हाती देते धनी
गुलाबाचं फुल ।

सक्काय पासुन संसाराचा
ओढाचा गाडा ।
इसरले मी आता
गनिताचा फाडा ।

जनमच बाईचा
कितीबी करा सरत न्हाई ।
थोच मंते मले फासी घेइन
मी मातर कानं मरत नाई ।

चांगल्या दिनाची म्या
लै पायली वाट ।
जलमालेच जुतली
माया गरिबीची खाट ।

देउ दे आता गुलाबाचं फुल
दावतो त्याले सबन रुल ।
सगयायनं केलं कसं
थोच करतो आपलाबी उसुल ।
© Sanjay R.

" जय गजानन "

आम्ही भक्त
तुझे गजानना ।
वंदन करतो
पुन्हा पुन्हा ।।

शेगा्वी जावे
वाटे मना ।
दर्शनाची आस
आहे जना ।।

कांदा भाकर
नको कुणा ।
श्री गजानन
सारे म्हणा ।।
Sanjay R.