Wednesday, February 7, 2018

" नाव मायं सबिना "

नाव मायं सबिना
कोनी मले काइ मना ।
आज सांगतो तुमाले
आमच्या मिया बिबिचा रोना ।

रोज रोज माया
जिवनात हाये.ना थेच ।
पिसायला जिव महा
झालं आता लैच ।

दरसाल रायते माया
कडिवर एक मुल ।
आनं हाती देते धनी
गुलाबाचं फुल ।

सक्काय पासुन संसाराचा
ओढाचा गाडा ।
इसरले मी आता
गनिताचा फाडा ।

जनमच बाईचा
कितीबी करा सरत न्हाई ।
थोच मंते मले फासी घेइन
मी मातर कानं मरत नाई ।

चांगल्या दिनाची म्या
लै पायली वाट ।
जलमालेच जुतली
माया गरिबीची खाट ।

देउ दे आता गुलाबाचं फुल
दावतो त्याले सबन रुल ।
सगयायनं केलं कसं
थोच करतो आपलाबी उसुल ।
© Sanjay R.

No comments: