यादमे उनके वह
आज खुब रोया ।
कल तक था साथ
आज कैसे खोया ।
रीश्ते नाते धागे कच्चे
कोन अपना कोन पराया ।
धुंड रहा अव भी दिनरात
साथ अपने अपना साया ।
Sanjay R.
Wednesday, September 20, 2017
कोन पराया
Wednesday, September 13, 2017
शाम शाम
ओठी प्रभुचे नाम
मनात शाम शाम ।
मनमोहना तुज विण
जिवा नको विश्राम ।
तुझ्या भक्तीची आस
घेउ कसा आराम ।
रंगले नामात तुझ्या
चरणी तुझ्या दे विराम ।
कन्हैय्या तु राधेचा
मी मीरा तु शाम शाम ।
Sanjay R.
Saturday, August 26, 2017
" राम रहीम आसाराम "
नावात त्यांच्या राम
भोंदु बाबास प्रणाम ।
राम पाल कुणी तर
राम रहिम आसाराम ।
भोळी भाबडी जनता
नकळे तयासी हराम ।
बुद्धी शुद्धी हरपली
बळी घेतो नराधम ।
नाही सोडले देवा तुज
आडोशाला तुझे नाम ।
चाले लबाडी लफंग्यांची
करी चारीत्र्य निलाम ।
भोळा भक्त देवा तुझा
झाला राक्षसांचा गुलाम ।
Sanjay R.
" ध्यास "
लागला ध्यास
अंतरात विश्वास
एक एक श्वास
मनी आभास
चालला प्रवास
कधी फास
कधी सुहास
आनंद निवास
जिवन खास
Sanjay R.
Thursday, August 24, 2017
" वेध "
नजरेने तुझ्या ही
काय जादु केली ।
सर्वस्व विसरलो
तहान भुक नेली ।
सदैव तुझेच वेध
झोप माझी उडाली ।
स्वप्नातही तुच असे
जिव होतो वर खाली ।
हसतो मी पण बघुन
हास्य तुझ्या गाली ।
शोधतो भिर भिर मी
आहेस तुच खयाली ।
Sanjay R.