Wednesday, March 29, 2017

" आनंदानं झुलावं "

खुप वाटतं मला
डोळ्यात तुझ्या बघावं ।
चांदण्या रात्री छान
चंद्राखाली बसावं ।
अंतरात डोकाउन
हितगुज थोडं करावं ।
हास्यात गोड तुझ्या
खळखळुन हसावं ।
रातराणीच्या सुगंधात
विसरुन सारं रमावं ।
स्वप्नांच्या दुनियेतलं
सत्यात सारं जगावं ।
तुझ्या माझ्या प्रितीचं
फुल सुंदर उमलावं ।
वार्याच्या झुळकीसह
आनंदानं झुलावं ।
Sanjay R.

" हकिकत पुरी "

मेरे ख्वाबो की है
तु एक परी ।
कम कब होगी
हमारी यह दुरी ।
हातोमे हात हो
यही चाहत मेरी ।
वक्त तुही बता
कब होगी हकिकत पुरी ।
Sanjay R.

Saturday, March 25, 2017

" बाते तस्वीरसे "

क्या कहु मै दिलसे
यादोमे तडपता ऐसे ।
आखेभी तरस गयी
मिलने उनकी हसीसे ।
दिन बीत गये कइ
मिल न पाये उनसे ।
वक्त अबतो रुक जा
झुमने दो खुशीसे ।
चाहत तो है बहोत
मिला दो बस उनसे ।
लब्ज इकठ्ठा कर रखे है
कह देंगे सब उनसे ।
हो न हो मुलाकात कही
तब होगी बाते तस्वीरसे ।
Sanjay R.

" विसरलो हसणं "

खरच का विसरलो
आम्ही हसणं ।
आपलसं केलय
तणावात असणं ।
प्रगतीच्या वाटेवर
का नुसतच जगणं ।
कपाळावर आठ्या
आणी विचारात फसणं ।
जगाच्या यादीत
कुठेच नसणं ।
चिंताच सार्या आणी
श्वास ढकलणं ।
कुठवर चालायचं
खोलात रुतणं ।
द्याना कोणी
हास्य उसणं ।
नाहीतर होइल
असुन नसणं ।
Sanjay R.

Thursday, March 23, 2017

" वय म्हातारं "

तुटला संसार
मोडले घर ।
सारे जिवन
झाले अधर ।

पाणावलेले डोळे
झुकली नजर ।
त्राण सरले
मनात थरथर ।

टेकले हात
झुकले अंबर ।
वय वर्ष
झाले शंभर ।

जगलो वाचलो
कुणास कदर ।
नाही उरला
शेला पदर ।

नाती गोती
मायेची पाखरं ।
नको कुणालाच
घरात म्हातारं ।

इच्छाच सरल्या
नको वाटतं सारं ।
वेध लागले आता
जायचे वर ।
Sanjay R.