Thursday, March 23, 2017

" वय म्हातारं "

तुटला संसार
मोडले घर ।
सारे जिवन
झाले अधर ।

पाणावलेले डोळे
झुकली नजर ।
त्राण सरले
मनात थरथर ।

टेकले हात
झुकले अंबर ।
वय वर्ष
झाले शंभर ।

जगलो वाचलो
कुणास कदर ।
नाही उरला
शेला पदर ।

नाती गोती
मायेची पाखरं ।
नको कुणालाच
घरात म्हातारं ।

इच्छाच सरल्या
नको वाटतं सारं ।
वेध लागले आता
जायचे वर ।
Sanjay R.

No comments: