Tuesday, January 24, 2017

" शब्दांचे मोल "

हलतात ओठ त्यांचे
शब्द का झालेत अबोल ।
मनात  खुप बोलायचे
परी शब्द अंतरात खोल ।
निरर्थक जो बोले त्यासी
नकळे शब्दांचे मोल ।
शब्द शब्दात फिरवुनी
साधी स्वार्थाचा गोल ।
घेउनी आधार शब्दांचा
घालवी सर्वस्वाचा तोल ।
गोड मधुर वाणी ज्यांची
शब्द तयांचे अनमोल ।
Sanjay R.

Monday, January 23, 2017

" प्रकाशीत कविता 22.01.2017 "

दैनिक तरूण भारत नागपूर आसमंत पुरवणीत प्रकाशित .... संपादकांचे खुप खुप आभार.
दिनांक -22.01.2017

" कसं जगायचं "

डोळ्यात तुझ्या
मज बघायचं
गालांना तुझ्या
मज धरायचं ।
ओठांना तुझ्या
मज छळायचं ।
केसात गुलाब
मज माळायचा ।
तुझ्यात एकरुप
मज व्हायाचं ।
बेभान होउन
मज जगायचं ।
Sanjay R.

Thursday, January 19, 2017

" तो बहार आ जाती "

तरस गये थे हम बस
एक नजर देखने तुम्हे ।
बडी उम्मीदोसे आये थे
हम मुलाकात के बहाने ।
पर लौट आये मायुससे
अब देखते सीर्फ तस्वरमे तुम्हे ।
हो जाते अगर दिदार आपके
तो दिलमे बहार आ जाती ।
लफ्ज खुद ब खुद करते बयां
और कविता कुछ कह जाती ।
Sanjay R.

Tuesday, January 17, 2017

" परी हो तुम "

नन्ही सी नाजुकसी
कोमल परी हो तुम ।
देखा था सपना
बस वैसीही हो तुम ।
चंचलसी आखे ओर
हलकीसी मुस्कान ।
लगती हो जैसे
रोशन हुवा आसमान ।
Sanjay R.

नजर तुम्हारी
दिलमे बहार ।
रंग गुलाबी
चेहरे पे निखार ।
रेशमसी जुल्फे
ओठो पर प्यार ।
चाहत हमारी
दिन रात हो दिदार ।
दिलमे उठती
उमंगे हजार ।
एक मुस्कुराहट और
खुशीयो की बौछार ।
तुम और हम
बस प्यार ही प्यार ।
Sanjay R.

सुर्याचा जेव्हा
चढतो पारा ।
नकोसा जिव
आणी
घामाच्या धारा ।
वाहतो गार
झुळझुळ वारा ।
गार गार वारा
थंडीचा शहारा ।
देतो उब
पेटता निखारा ।
मनाच्या गाभार्यात
विसावतो तारा ।
Sanjay R.