Thursday, November 17, 2016

" नोटा झाल्या दफा "

नोट हजार पाचशेची
झाली दफा ।
बातमी ऐकुन सारेच
टाकताहेत धापा ।
काळ्या पैशान कशा
उडवल्या झोपा ।
गरीब  श्रीमंत मरताहेत
बॅकेच्या खेपा ।
बाजार मंदावला
रुसला नफा ।
रुपयाही झाला महाग
खिसा झाला सफा ।
कुणी सांगा सरकारला
कमी पडतोय ताफा ।
Sanjay R.

Wednesday, November 16, 2016

" दिलकी कश्ती "

कब उनसे
मुलाकात होगी ।
लब्ज दो चार
पर बात होगी ।
हो किस्मत तो
जिंदगी साथ होगी ।
वरना दिलमे
वही याद होगी ।
निकले जब
अरमानोकी कश्ती
सवार उसमे
दिलकी आहत होगी ।
Sanjay R.

माझ्या कविता

https://spronghe.wordpress.com/2014/09/?_utm_source=1-2-2

Tuesday, November 15, 2016

" मनातलं गुज "

कुणास ठाउक का
वाटतं मला असच
खुप तुझ्याशी बोलावं ।
मनातलं गुज माझ्या
न सांगता तुला कळावं ।
दुर त्या आकाशात
घेउन हातात हात
सोबत तुझ्या पळावं ।
कधी मी तुला तर
कधी तु मला
हलकेच थोडं छळावं ।
घालवुन मग राग
मनानं प्रेमात वळावं ।
Sanjay R.

" रजईची सोबत "

अशी ही सायंकाळ
आली घेउन गारवा ।
हवीशी वाटे उब
निशेला थोडे थांबवा ।
रजईची सोबत बघा
देइ मायेचा ओलावा ।
येयील घेउन स्वप्नांना
कळी आनंदाची खुलवा ।
Sanjay R.