चला जाउ या
कवितेच्या गावी ।
संग्रह शब्दांचा
करु तीच्या नावी ।
कळी फुलवू शब्दांची
गुंफु माळ अलंकारांची ।
Sanjay R.
Tuesday, November 1, 2016
" कळी फुलवू शब्दांची "
" फुलली सकाळ *
नाकात नथनी
गळ्यात माळ ।
बाजुबंध तुझे
फुलली सकाळ ।
कपाळी बींदी
केसात गजरा ।
चेहर्यावर भाव
वाटतो लाजरा ।
चंद्रकोर कपाळी
हास्य मनोहारी ।
खुलले तुझे रुप
शालुत भरजरी ।
Sanjay R.
Friday, October 28, 2016
" हम तुम "
तपती अंगारोमे
क्यु जला रही हो ।
सपने तो हुवे चुर
क्यु सुला रही हो ।
भुले तो कबके थे
यादे क्यु दीला रही हो ।
अब तो आसु भी न रहे
क्यु रुला रही हो ।
रासते कबके बिछडे
चौराह क्यु दीखा रही हो ।
तुम हम एक ना अब
दुख तबभी पीला रही हो ।
Sanjay R.
" दिवाळी आली खीसा खाली "
आली आली
दिवाळी आली ।
रंगल्या भींती
सफाई झाली ।
नवीन कपडे
साडी मखमली ।
खरेदी सोबत
बरीच झाली ।
लाडु अनरसे
चिवडा चकली ।
दागीने काही
असली नकली ।
दीवे फटाके
तोरण माळी ।
भरला उत्साह
घरात खुशयाली ।
मुलांच्या बघा
आनंद गाली ।
पुजन लक्ष्मीचे
खीसा खाली ।
Sanjay R.
Thursday, October 27, 2016
" आली दिवाळी नाही नव्हाळी "
दीन दीन दिवाळी
आता राहीली नाही नव्हाळी ।।
धनच नाही नशीबात तर
धनत्रयोदशीला वाजवाची कशी टाळी ।।
वध करुन नरकासुराचा
करायचे अभ्यंग स्नान सकाळी ।।
लावल्या असत्या दीप माळा
सरले तेल आली दिवाळी अकाळी ।।
नेहमीच करतो आराधना
पावग लक्ष्मी नक्की तु यावेळी ।।
भाउ बिजेला बहीणीची माया
ओवाळणीला नाही खिशात पाकळी ।।
कसली ही दिवळी कसली नव्हाळी
जिवन आमचे ही नेहमीचीच
टवाळी ।।
अजुनही आहे आशा
तुटेल कधी तरी ही साखळी ।।
Sanjay R.