Thursday, October 27, 2016

" आली दिवाळी नाही नव्हाळी "

दीन दीन दिवाळी
आता राहीली नाही नव्हाळी ।।
धनच नाही नशीबात तर
धनत्रयोदशीला वाजवाची कशी टाळी ।।
वध करुन नरकासुराचा
करायचे अभ्यंग स्नान सकाळी ।।
लावल्या असत्या दीप माळा
सरले तेल आली दिवाळी अकाळी ।।
नेहमीच करतो आराधना
पावग लक्ष्मी नक्की तु यावेळी ।।
भाउ बिजेला बहीणीची माया
ओवाळणीला नाही खिशात पाकळी ।।
कसली ही दिवळी कसली नव्हाळी
जिवन आमचे ही नेहमीचीच
टवाळी ।।
अजुनही आहे आशा
तुटेल कधी तरी ही साखळी ।।
Sanjay R.

No comments: