Sunday, April 17, 2016

" आधार हवा "

उन्हाच्या झळा
पावसाच्या कळा ।
दाबुन कान नाक
आवळायचा गळा ।
जगायचे जिवन तर
नुसते पळा पळा ।
Sanjay R.

खरच जिवन रथ
असाच असावा ।
खांद्याचा आधार 
शेवट पर्यंत पुरावा ।
संसार आनंदात
न्हाउन निघावा ।
मनाचा प्रत्येक कोपरा
अमरुतात भिजुन जावा ।
Sanjay R.

Saturday, April 16, 2016

" जिवनाची जोड "

नाही खाण्यास गोड धोड
पोर बघा हो झाली कशी रोड ।
पैसा पैसा का असा
त्याची कशी जिवनाशी जोड ।
नाही जुळले माझे तया
नाही गवसली कुठे तोड ।
पाहतो सार्या दीशा असा मी
सारेच करती लुटायची होड ।
देतो सोडुन आता सारे
नाही पेलवत मजला लोड ।
पाश उलटले जिवनाचे आता
फंदा वेडावतो कसा बेजोड ।
सरली आसवं डोळ्यातली
पेटु दे चीता दुर सार गिधाडं ।
नको रडउस तान्हुल्यासी
हसाया देजो धाडुन एक झाड ।
Sanjay R.

" स्वप्न "

मोठ्यानं लहानावर
करायचे राज्य ।

नियम हा सर्वमान्य
आहे अवीभाज्य ।
 
तुणतणं वाजवा कितीही
ढोल नगार्याचाच बाजा ।

दुसरा तिसरा नको आता
मोठा मीच आहे माझा ।
Sanjay R.

कालच्या त्या भेटीची
बातच काही औरच होती ।

मैफील तर आजही सजली
पण अदा काही औरच होती ।

ताल सुर आणी सोबतीला नाद
संगम त्यांचा काही औरच होता ।

रुणझुण रुणझुण पैंजण वाजे
थिरकली पावलं काही औरच होती ।
Sanjay R.

हेच तर स्वप्न होते माझे
ठेउन घ्यायचे सुर्याला बॅगेत ।
गरज पडताच रात्री मग
घेउन सुर्य बघायचे काळोखात ।
Sanjay R.

Tuesday, April 12, 2016

" रोज जलता है "

कभी याद हमे
वो करते है  ।
कभी हम उनको
दिलमे लिये चलते है ।
मोहब्बत का आलम
बस युही चलता है ।
दिलके अंदर कौन देखता
वो तो रोज जलता है ।
Sanjay R.

Sunday, April 10, 2016

उन्हाळा

लागता उन्हाळ्याची चाहुल
प्रश्न पाण्याचा पुढे येतो ।
आटलेल्या खोल विहीरी
आसवांना सोकुन घेतो ।
Sanjay R.