Tuesday, September 15, 2015

महादेव भोळा

ष्रेम निर्मळ भावनांचा मळा
प्रत्येक जण इथं होतो खुळा ।
मनात एकमेकासाठी वाजे खुळखुळा
कधी आईचा तानुल्यासाठी कळवळा ।
Sanjay R

हिंदी राष्ट्र भाषा अमुची
देइ नव दीशा समुची ।
Sanjay R.

पार्वतीचा महादेव भोळा
त्याच्या नंदी चा हा पोळा ।
बळी पुजतो नंदी बैल
करुनी पक्वान्न सोळा ।
कुठे भरते गोटमार
कुठे गाढवांचा मेळा ।
नागपुरात निघते मारबत
कुठे चाले अम्रुत सोहळा ।
Sanjay R.

Saturday, September 12, 2015

" शेतकर्याची व्यथा "

लय काम असते
वरसभर बघा ।
नांगरन वखरन
समदच जोखा ।
बीना बैलान
पान नाइ हालत ।
खाचर बंडी
कहीच नाही चालत ।
लय कामं रायते
बैलच वायते ।
मुन त्याच्या पुजेचं
शेतकरी पायते ।
Sanjay R.

ठाउक नाइ आता
सांगु कसं पावसाले ।
डुबली अमदा शेती
काहीच न्हाइ जगाले ।
भुकेनं रडते पोरं
बायकी बी बिछान्याले
कस जगाचं आता
सांगन कोनी आमाले ।
Sanjay R.




" तुझी अदा "

खळखळुन हसायची
हीच तुझी अदा ।
मनाला सुखाउन जाते
आणी होतो फीदा ।
Sanjay R.

वाह वा
क्या अदा ।
हो गये हम
आपपे फीदा ।
मुस्कुराती रहो
तुम सदा ।
ना होना कभी
हमसे जुदा ।
साथ होंगे आपके
आपके सदा ।
जिंदगीका यही
करते है वादा ।
Sanjay R.


Friday, September 11, 2015

याद जब आये

याद जब उनकी
दिलमे आये ।
सामने हम तब
उनको पाये ।
आंखे भी कुछ
बहकसी जाय ।
चेहरेकी अदा
प्यार झलकाये ।
ओठ भी फीर
गीत गुनगुनाये ।
Sanjay R.

Tuesday, September 8, 2015

" हरपले बालपण "

गेले ते दिवस लहान पणातले
पुढे आलो आता क्षण जिवनातले ।
वाटायचं तेव्हा केव्हा होइल मोठा
छळतात सारे जिव आपला छोटा ।
मनात यायचं तेव्हा होउ दे मोठ
खुप असेल पैसा नसु आपण छोटं ।
मोठं झालं की मस्त फिरायचं
मनाला वाटेल तसच करायचं ।
रागावणार नाही कोणी
खुप हसायचं मस्तीत जगायचं ।
गाडी घोडा असेल सोबत
वाट्टेल तसे फिरायचे ।
चुकुन कोणी बोललं तर
जोरात आवाज चढवायचे ।
काहीच नाही जमत मन करपलं
मोठं होउन कसं बालपण हरपलं ।
Sanjay R.