Saturday, September 12, 2015

" शेतकर्याची व्यथा "

लय काम असते
वरसभर बघा ।
नांगरन वखरन
समदच जोखा ।
बीना बैलान
पान नाइ हालत ।
खाचर बंडी
कहीच नाही चालत ।
लय कामं रायते
बैलच वायते ।
मुन त्याच्या पुजेचं
शेतकरी पायते ।
Sanjay R.

ठाउक नाइ आता
सांगु कसं पावसाले ।
डुबली अमदा शेती
काहीच न्हाइ जगाले ।
भुकेनं रडते पोरं
बायकी बी बिछान्याले
कस जगाचं आता
सांगन कोनी आमाले ।
Sanjay R.




No comments: