Thursday, September 3, 2015

गरीबी

तुच रे जवाबदार माणसा ।
नकोच ना तला पाउस ।
तोडुन जंगल उजाडलं सारं ।
फिटउन घे आता आपलीच हौस ।
Sanjay R.

गरीबीच आहे
पाया आमच्या देशाचा ।
दाखवतो दया माया
हा किती मोठेपणा
आमच्या मनाचा ।
सगळेच दाखवतात
थोडी कळकळ आणी
चिमुटभर मळमळ ।
थंडच आहे रक्त उरात
देणे घेणेच नाही कुणा
होणार कशी सळसळ ।
जगतो बिचारा कसातरी
अन्नासाठी दारोदारी
मेला गेला नाही सुतक ।
दिली म्हणे सरकारनं
अन्न सुरक्षेची हमी
का मग ही अन्नाची कमी ।
Sanjay R.

रात्रीचे काही वेगळेच रंग
सगळेच कशे असतात दंग ।

हवेत दरवळतो रातराणीचा  सुगंध
चंद्र असतो मस्तीत चांदणीच्या संग।

मधेच चमचमतो कळोखात काजवा
रातकिड्यांची समधी होते भंग ।
Sanjay R.

जायचं जर असेल जिवनात पुढे
अभ्यासाचे ओझे वाहायचे थोडे ।

एक एक पाउल मग ठेवायचे पुढे
सर होतील श्रमाने सारे विद्येचे धडे ।

झिजवायचे आपले पायातले जोडे
शर्यत जिवनाची जिंकतील घोडे ।
Sanjay R.

किती तु लावलीस ओढ
तुझ्या विचारानी  मग
वाटतं सारंच गोड ।

तुझं हळुच हसणं आणी
तिरक्या नजरेनं बघणं
दोन्हीची अप्रतीम जोड ।
S. Ronghe









Saturday, August 29, 2015

अरमान

जब बात दिलकी हो
तो दिलको कैसे समझाये ।
अपनोको कहकर देखा हमने
अबतो सपनेभी खो गये ।
Sanjay R.

दुरही रहना
ये हसीन गोरी ।
टुटेंगे अरमान
बनी रक्खो दुरी ।
हसरते ना होगी
कभी भी पुरी ।
संभालो दिलको
न चलाओ छुरी ।
जालीम है दुनीया
सोच उनकी बुरी ।
Sanjay R.

बंधन राखीचे

नाही हे नाते तुझे माझे
फक्त एका धाग्याचे ।
लाडाची बहीण तु माझी
प्रेम लाभु दे जन्मो जन्माचे ।

मिळली मज जशी ग
आईच्या मायेची पाखर ।
तितकीच गोड दीली मज तु
ताई तुझ्या प्रेमाची साखर ।

आईनेच बांधीयेले हे
बंधन आपुल्या नात्याचे ।
रक्षक तुझा मी  आयुष्याचा
यातच सार्थक माझ्या जन्माचे ।
Sanjay R.

नारळी पौर्णीमा आहे आज
रक्षाबंधन करणार का ।
ए ताई राखी आज तु मज
बांधणार का ।
नाते तुझे माझे भावा बहीणीचे
रक्षणाची धुरा मज देशील का ।
देतो वचन तुज जन्मभर रक्षणाचे
धाग्यात तु मज बांधशील का ।
Sanjay R.

सपनो के साथ

भुत काळ ला म्हणतो
यादे उन दीनो की ।
भवीष्य काळासाठी सांगतो
वादे ये जिंदगी के ।

अख्या जिवनाचा घोळ
यातच जातो निघुन ।
उरलं सुरलं आयुष्य
घेतो मधेच जगुन ।

जन्म आणी म्रुत्यु
दोन्ही जिवनाची टोकं ।
सारं आयुष्य ठिगळांचं
बोट लावाल तीथे भोकं ।
Sanjay R.

कभी अपनोकी याद
कभी सपनोके साथ ।
तुटता हुवा एक तारा 
मै और चांदनी रात ।
ढल गया जब अंधेरा
खो गया चांदका साथ ।
Sanjay R.

ढलता हुवा सुरज
बिखरती हुयी शाम
बादलो के पीछे छीपा
नीला अंबर नीला धाम ।
पंछी  लौटने लगे अब घर
रात आजकी चांदके नाम  ।
Sanjay R.

Tuesday, August 25, 2015

बाजार

रोज भरतो इथं
बाजार नव नवा ।
कोण कोणाचा इथे
आधार कुणास हवा ।
खेळ चालतो पटावर
हार जीतीचा नाही दुवा ।
टाकायचे पाउल पुढे
पुढच्यास सारायचे
मागे तवा ।
Sanjay R.