Thursday, April 16, 2015

" डोळ्यात पाणी "

स्त्री जन्मा का ही
अशी तुझी कहाणी ।
चालायची हि वाट
दुरवर तुज अनवाणी ।
नशिबात काय तुझ्या
कधीच न कळे कुणा ।
कुणी कधी राणी न
कधी डोळ्यात पाणी ।
Sanjay R.
��������������

Monday, April 13, 2015

" प्रवास लोकलचा "

" प्रवास लोकलचा "

मुंबईच्या गर्दिची
अजबच किमया ।
धरायची लोकल
थोड जोरात पळुया ।

शिरताच आत
हाप होते शांत ।
रोजचे सवंगडी
गप्पागोष्टी निवांत ।

स्टेशन येताच परत
सरसावतात लढाया ।
कामापेक्षा भारी प्रवास
आयष्य अर्धे जाइ वाया ।

रोजचाच परीपाठ त्यांचा
अंगवळणी त्यांच्या पडला ।
नवखा त्या गर्दिला मी
दुर सार्यांनी रेटला ।

हिम्मत करुन कशिबशी
शिरलो मी आत ।
छळलं गर्दिन खुप
नको वाटे मुंबईची साथ ।
Sanjay R.

Sunday, April 12, 2015

" पेटेल मशाल "

सोसतो बिचारा तो
होत आहेत किती हाल ।
नाहिच कुणाला काळजी
करताहेत त्याला हलाल ।

पोशिंदा सार्या जगाचा तो
नाहि कष्टाचा त्यास मलाल ।
टकमक बघताहेत सारे
नाग विषारी ते जहाल ।

सहनशिलता संपली आता
लुटारुंची फौज विशाल ।
दुर नाही बळिराजाचा दिवस
न विझणारी पेटेल मशाल ।
Sanjay R.

Saturday, April 11, 2015

" आनंद "

कवितेत असतो स्नेह
ह्रुदयाची व्यथा  त्यात ।
आनंदाचे क्षण थोडे
रोमांचित होतो देह ।
Sanjay R.
����������������

Sunday, April 5, 2015

" जादु शब्दांची "

मनात माझ्या
वसतेस तु
क्षणोक्षणी का
दिसतेस तु ।
Sanjay R.

शब्दांच्या जादुची
किमयाच न्यारी ।
विचार मनातले
येतात दारी ।
मनावर कधी ते
करतात स्वारी ।
कधी मनातच
होतात प्रहरी ।
Sanjay R.