Sunday, April 12, 2015

" पेटेल मशाल "

सोसतो बिचारा तो
होत आहेत किती हाल ।
नाहिच कुणाला काळजी
करताहेत त्याला हलाल ।

पोशिंदा सार्या जगाचा तो
नाहि कष्टाचा त्यास मलाल ।
टकमक बघताहेत सारे
नाग विषारी ते जहाल ।

सहनशिलता संपली आता
लुटारुंची फौज विशाल ।
दुर नाही बळिराजाचा दिवस
न विझणारी पेटेल मशाल ।
Sanjay R.

Saturday, April 11, 2015

" आनंद "

कवितेत असतो स्नेह
ह्रुदयाची व्यथा  त्यात ।
आनंदाचे क्षण थोडे
रोमांचित होतो देह ।
Sanjay R.
����������������

Sunday, April 5, 2015

" जादु शब्दांची "

मनात माझ्या
वसतेस तु
क्षणोक्षणी का
दिसतेस तु ।
Sanjay R.

शब्दांच्या जादुची
किमयाच न्यारी ।
विचार मनातले
येतात दारी ।
मनावर कधी ते
करतात स्वारी ।
कधी मनातच
होतात प्रहरी ।
Sanjay R.

Thursday, April 2, 2015

" कसं जगायचं तुम्हीच सांगा "

गरीबी जन्माची
आहे संगतिला
अपुरा पैसा
पोट भरायला ।
कसं जगायचं आता
तुम्हीच सांगा ।

दिवस रात्र
ऊपसतो कष्ट
तरीही लक्ष्मी
आहे रुष्ठ ।
कसं जगायचं
तुम्हीच सांगा ।

महागाइनं तर
मोडली कंबर
किम्मत वस्तुची
होते शंभर ।
कसं जगायचं
तुम्हीच सांगा ।

सरकारही आमचं
किती लुटतं
श्रिमंतांचं मात्र
पोट सुटतं
कस जगायचं
तुम्हीच सांगा ।

लेकराला शाळेत
धाडतो म्हटलं
तिथही पैशानं
मागं लोटलं
कसं जगायचं
तुम्हीच सांगा

मरणही आता
महाग झालं
चितेला लाकुड
नाही मिळालं
कसं जगायचं
तुम्हीच सांगा ।
Sanjay R.

Monday, March 30, 2015

" मन आभाळ आभाळ "

मन आभाळ आभाळ
ढगांचा हा खेळ।
कोणी आहे मवाळ
कुणी आगीचा जंजाळ ।

मन जिंकायचे इथे
मिळे प्रेमाचे आयाळ ।
नका करु कुणा
शब्दांनी घायाळ ।

आपले होती सारे
वाणी असता मधाळ ।
नाही कुणाच्या हती
अंताचा तो काळ ।
Sanjay R.

प्रवासाला अंत
हा असतोच ।
मार्ग कितीही
आढ्या वेढ्याचा असो
कुठे तरी
तो संपतोच ।
अनुभव मात्र
प्रवासातले
असतिल जरी
सुखद वा कटु
कोपर्यात मनाच्या
मी जपतोच ।
Sanjay R.

शब्दांनीच शब्दांचा
काय अनर्थ केला ।
ह्रुदयी काय कुणाच्या
आडवा स्वार्थ आला ।
रचना रुपांकित होता
स्वरुपे परमार्थ जळाला ।
Sanjay R.