सांग रे देवा तुच आता
चंद्र चांदणीची प्रेम गाथा ।
लैला मजनु हिर रांझा
सार्यांची का तीच व्यथा ।
माझही आहे प्रेम तिच्यावर
होइल का मग आमची कथा ।
प्रेमाविण रे जिवन अधुरे
चाकं असे या जिवनरथा ।
Sanjay R.
सांग रे देवा तुच आता
चंद्र चांदणीची प्रेम गाथा ।
लैला मजनु हिर रांझा
सार्यांची का तीच व्यथा ।
माझही आहे प्रेम तिच्यावर
होइल का मग आमची कथा ।
प्रेमाविण रे जिवन अधुरे
चाकं असे या जिवनरथा ।
Sanjay R.
असता मनी काही ध्यास ।
छळतो मज हा स्वप्न भास ।
कधी आनंदानं फुलतो श्वास ।
कधी होतो दुखा:चा आभास ।
Sanjay R.
ना मज कोणी तुडवले
ना भुललो मी वाटा ।
क्षणीक असे जिवन माझे
सोबतीचा इतकाच वाटा ।
Sanjay R.
कितीही मोठ होउ दे
विसरायच वय ।
लहान होउन
साधायची लय ।
आनंदी जगात
मिळवायचा विजय ।
Sanjay R.
घरोघरची एकच कथा
जगायच कसं हिच व्यथा ।
महागाइन थकले सारे
खर्चांची आहे मोठी गाथा ।
भ्रष्टाचारी माजलेत सारे
भागेल कशे रिकाम्या हाता ।
नाही उरला वाली कोणी
पिटायचा फक्त आपलाच माथा ।
उपाशी आहे टिचभर खळगी
वाचव रे देवा तुच आता ।
Sanjay R.
नसेल ती जेवणात
चवच नाही येणार ।
जास्तच झाली तर
कुणीच नाही जेवणार ।
टिखट लाल मिरची
जिभेला चव द्यायची
अतीच कोणी केल तर
सवय तिची झोंबायची ।
Sanjay R.
मनात विचारांची गर्दी झाली
ओठी शब्दांची किलबील आली ।
फुलले हास्य हळुच गाली
अवतरले शब्द कविता झाली ।
Sanjay R.
"दिल की बात"
बात दिलकी जब करे हम
उसपे ना किसीका जोर
ना है वह कमजोर ।
बस सावन का महीना
और पवन का सोर ।
कभी इस ओर तो
कभी उस ओर ।
Sanjay R
रुठने मनाने का
नाम है जिंदगी
दो कदम बढो आगे
खुशीयोभरी
है ये जिंदगी ।
Sanjay R.