Thursday, February 26, 2015

" व्यथा "

घरोघरची एकच कथा
जगायच कसं हिच व्यथा ।

महागाइन थकले सारे
खर्चांची आहे मोठी गाथा ।

भ्रष्टाचारी माजलेत सारे
भागेल कशे रिकाम्या हाता ।

नाही उरला वाली कोणी
पिटायचा फक्त आपलाच माथा ।

उपाशी आहे टिचभर खळगी
वाचव रे देवा तुच आता ।
Sanjay R.

" लाल मिरची "

नसेल ती जेवणात
चवच नाही येणार ।
जास्तच झाली तर
कुणीच नाही जेवणार ।

टिखट लाल मिरची
जिभेला चव द्यायची
अतीच कोणी केल तर
सवय तिची झोंबायची ।
Sanjay R.

मनात विचारांची गर्दी झाली 
ओठी शब्दांची किलबील आली ।
फुलले हास्य हळुच गाली
अवतरले शब्द कविता झाली ।
Sanjay R.


Saturday, February 21, 2015

" बात दिलकी "


"दिल की बात"
बात दिलकी जब करे हम
उसपे ना किसीका जोर
ना है वह कमजोर ।
बस सावन का महीना
और पवन का सोर ।
कभी इस ओर तो
कभी उस ओर ।
Sanjay R

रुठने मनाने का
नाम है जिंदगी
दो कदम बढो आगे
खुशीयोभरी
है ये जिंदगी ।
Sanjay R.

Friday, February 20, 2015

" आठवण "

का ग अशी तु किम्मत करतेस
अनमोल अशा माझ्या प्रेमाची ।
खर आहे जगतो मी कवितेतच
पण करुन बघ जरा आठवण
कवितेतल्या प्रत्येक शब्दाची ।
Sanjay R.

का अशी तु
दुर जातेस ।
मनात माझ्या
तुच आहेस ।

बघ जरा तु
त्या चंद्राला
चांदणीच त्याची
प्रीत आहे ।
SanjayR.

" ओंजळीत गगण "

कळतं रे मजला
तुझही मन ।
देउन बघ साद
मलाही हवा तो क्षण ।

सरतील सारी दुख:
रोमांचीत तन ।
आनंदाश्रुच सांगतील
येयील ओंजळीत गगण ।
Sanjay R.

मनाच्या उदासीनं
सारं तंत्रच बिघडतं ।
आसवांचा नाही भरवसा
मन अतीच दुखावतं ।
असतात कधी ते फसवे
असत्यही त्यात सामावतं ।
हसणच बर आपलं
मस्तीत छान जगायचं ।
Sanjay R.