Tuesday, July 23, 2024

तडजोड

टिकवायचे असेल नाते
तडजोड थोडी हवीच ।
शब्दांचे बाण सुटून जातात
घटना घडते मग नवीच ।

शब्दामागे शब्द येतात 
नाती कशी दूर होतात ।
सहज कुणी बोलून जातो
मनात तेच घर करतात ।

नको वाटतो मग दुरावा
आठवणींचा मनी पुरावा ।
पश्चातापच उरतो मागे
मन करते सतत धावा ।
Sanjay R.

No comments: