Thursday, December 31, 2020

" घड्याळ जीवनाचे "

कशाला हवे घड्याळ
आहेच कुणाला वेळ ।
जगताय ना जीवन
बसवा त्याचाच मेळ ।

बघा हा कोरोना
केला सगळाच खेळ ।
शिकलो म्हणतात किती
सगळीच तर होती भेळ ।

सोशल डिस्टनसिंग 
स्यानिटायझर शब्द न कळे ।
आपलेच गेलेत सोडून
अश्रूंनी ओले डोळे ।

वर्क फ्रॉम होम करा
लावा घराला टाळे ।
बंदिस्त होते श्वास
आत्माही कसा तळमळे ।

नोकरी धंदे किती बुडाले
उपाशी पोटात खळे ।
घर घर करत निघाले सारे
कोण कुणासाठी हळहळे ।

नवीन वर्ष येतंय आता
दिवसा मागून दिवस पळे ।
स्वछंद होऊन जगायचे आता
जुन्या वर्षाचे नकोच लळे ।
Sanjay R.


No comments: