Monday, December 24, 2018

" वृद्धावस्था "

काय आलेत दिवस
झाली कशी अवस्था ।
मुलं मुली गेलेत दूर
डोळे पाहताहेत रस्ता ।

हात पाय थकलेत आता
थरथरते अंग, वाटते भीती ।
म्हातारे झालेत डोळे
आसवही गळणार किती ।

कान अधू डोळे अधू
नाही कुणाची साथ ।
विसरू नको देवा मला
तुझाच रे मदतीला हात ।

आठवणींचा डोंगर उलटतो
होते विचारातच पहाट ।
नकोच वाटतो सूर्योदय
शोधतो अंधारातच वाट ।
Sanjay R.


No comments: