Friday, December 21, 2018

" शब्द अंतरातले "

शब्दा विन कुठली वाचा
अंतरात त्याचा ढाचा ।

जोडी मानाचे बंध
देई शब्दच आनंद ।

फुलावी मुखावरी हास्य
देई नेत्रात अश्रू ,भाष्य ।

कधी वाटे कर्णास गोड
कधी तुटे नात्याची जोड ।

शब्द शब्दातले अंतर
प्रवाह शब्दांचा निरंतर ।

मुखातून ध्वनित शब्द होती
कागदावरी ते अवतारती ।

गुणगान शब्दांचे गावे
अंतरात तेचि विसावे ।

सारेच आहे आपुल्या हाती
घात शब्दच करून जाती ।

फुलवू चला शब्दांची बाग
सापडेल आनंदाचा माग ।
Sanjay R.





No comments: