Wednesday, December 12, 2018

" अच्छे दिन येतेच आता "

अच्छे दिन येतेच आता
थांब ना वो थोडं ।
लग्नात न्हवत दिल मले
तुया बापानं घोडं ।
रिक्षामंदी आलतो तवा
काराले तुले जोड ।
अच्छे दिन येतेच आता
थांब ना वो थोडं ।
लय शिरमंत सासरा मने
दोस्ताय मंदी होड ।
भापकाच निस्ता दावला त्यानं
अंदर पोकळ फोड ।
अच्छे दिन येतेच आता
थांब ना वो थोडं ।
जाऊ दे झालं लगन आता
वाटते तूच मले गोड ।
फकस्त होऊ नको अप्पू
रायजो थोडी रोड ।
अच्छे दिन येतेच आता
थांब ना वो थोडं ।
कायची कायची हाऊस तुले
घेऊ नको लोड ।
साऱ्याच इच्छा पुऱ्या करिन
हट्ट तुया सोड ।
अच्छे दिन येतेच आता
थांब ना वो थोडं ।
अमदा न्हाई पिकलं मुन
रायली कर्जाची तोड ।
पुढच्या साली जमन भजन
देतो सोन्याची मोड ।
अच्छे दिन येतेच आता
थांब ना वो थोडं ।
Sanjay R.



No comments: