Monday, January 8, 2018

" मोगर्याविना गुलाब सुना "

एकांतात क्षणभर डोळे मिटता
आठवतो मज तो इतिहास जुना ।
तुजविण वाटे नको मज काही
समजावु कसे मी माझ्या मना ।

ह्रदयात माझ्या डोंगर आठवणिंचा
त्यातच शोधतो मी पाउल खुणा ।
ये परतुनी अंतरात माझ्या
फुलु दे अंगणात मोगरा पुन्हा ।

रोज बहरतो गुलाब अंगणी
पाकळ्यांचा सांग तु काय गुन्हा ।
झालेत कठोर काटे किती
मोगर्याविना किती गुलाब सुना ।
Sanjay R.

No comments: