Wednesday, January 8, 2025

अशी असतात नाती

होते पुढ्यातच जेव्हा
प्रश्न अंतरात किती  ।
कुठे शोधशील आता
झाली अवघीच माती ।

गोंजारले फुला संम
हळव्या मनाची प्रीती ।
रोपट्याचे झाड झाले
काय उरले या हाती ।

स्वप्न मनात तूझ्या रे
साथ हवी तुज होती ।
पुसल्या वाटा इथल्या
वाटते कशाची भीती ।

जळू दे निरंजन आता
ज्यासाठी पिळल्या वाती ।
आभाळ बघ मोकळे
अशी असतात नाती ।
Sanjay Ronghe


Saturday, January 4, 2025

उदास मन

कवितेला हवी
शब्दांची साथ ।
हळव्या मनाला
हृदयाशी गाठ ।

डोळ्यातले भाव
नजरच जाणते ।
अंतराचा ठाव
गालावर आणते ।

शब्द बोलण्या
जिव्हा थरथरते ।
भावना उठता
अंग सळसळते ।

उदास मन
फिरते पाठ ।
आसवांनी मग
भरतो काठ ।
Sanjay Ronghe

Friday, January 3, 2025

काठ

दगड मातीची ही वाट
बाजूला झुडपे ही दाट ।
दूर दूर किती ती जाते
आहे तिचा वेगळा थाट ।

पाहिले सोडून एकदा
विचारात झाली पहाट ।
धरून पुन्हा मी निघालो
पाहू जाते कुठे ती वाट ।

सुटता सुटेना तो नाद
पडेल परत का गाठ ।
पुन्हा तो दिवस सरला
सांग सोडू कशी मी पाठ ।

अबोल हा इथला वारा
शब्द ऐकण्या झालो ताठ ।
ऐकू दे तू शब्द एकदा
नदीला ही असतो काठ ।
Sanjay Ronghe


Tuesday, December 31, 2024

वर्ष गेले पूर्ण

वर्ष गेले पूर्ण पण
वेळ आहे अजून ।
नव्विन आले आता
कसे सजून धाजून ।

जुने तेच गेले
जाऊ दे ना उडत ।
गोंधळ होता सारा
होते किती रडत ।

पाहू आता नवे
काय काय होते ।
ये सोबत जरा
जाऊ जिथे नेते  ।

उरले सुरले मन
भिजेल थोडे वाटते ।
जुन्यांच्या आठवणींनी
हृदय माझे दाटते ।

गळा येतो भरून
डोळ्यातही आसवं ।
नको विचार करू
आहे जगच फसवं ।
Sanjay Ronghe

Tuesday, December 24, 2024

मैत्री चे जगच वेगळे

मैत्री चे जगच वेगळे
जमतात जिथे सगळे ।
नाते जरी नसले तरी
असतात सारेच आगळे ।

उडवतात मग कशी
एकमेकांची दांडी ।
जणू प्रत्येकाच्या हाती 
असते जादूची कांडी  ।

उजाडताच येते आठवण
भेटल्याशिवाय गमत नाही ।
मित्रंशिवाय जवळचा तर
दुसरा कुणी असत नाही ।

घरी जे जे नसेल माहित
तेही जाणतात मित्र सारे ।
मैत्री मधे जीवही देतील
तोडून कठीण सारे पाहरे ।

गरीब श्रीमंत न भेद कुठला
मैत्री विना तो कोण सुटला ।
कृष्ण सुदामा सखे सोबती
धागा तोही नाही तुटला ।
Sanjay Ronghe