कवितेला हवी
शब्दांची साथ ।
हळव्या मनाला
हृदयाशी गाठ ।
डोळ्यातले भाव
नजरच जाणते ।
अंतराचा ठाव
गालावर आणते ।
शब्द बोलण्या
जिव्हा थरथरते ।
भावना उठता
अंग सळसळते ।
उदास मन
फिरते पाठ ।
आसवांनी मग
भरतो काठ ।
Sanjay Ronghe
दगड मातीची ही वाट
बाजूला झुडपे ही दाट ।
दूर दूर किती ती जाते
आहे तिचा वेगळा थाट ।
पाहिले सोडून एकदा
विचारात झाली पहाट ।
धरून पुन्हा मी निघालो
पाहू जाते कुठे ती वाट ।
सुटता सुटेना तो नाद
पडेल परत का गाठ ।
पुन्हा तो दिवस सरला
सांग सोडू कशी मी पाठ ।
अबोल हा इथला वारा
शब्द ऐकण्या झालो ताठ ।
ऐकू दे तू शब्द एकदा
नदीला ही असतो काठ ।
Sanjay Ronghe
सांग मी तुज शोधू कुठे
का असा तू लावला ध्यास ।
मनात आठवणींचा सागर
नी मिलनाची आहे आस ।
भिर भिर ही होते नजर
पडतात मंद का हे श्वास ।
का धडधडते ही छाती
वाटतो बरा का एकांत वास ।
हरवतो मग मीही मलाच
सोसतो हवे नको ते त्रास ।
एकेक क्षण होतो कठीण
चढते धुंद नी तुझेच भास ।
सारून तो मधला पडदा
ये ना सखे मज तुझा हव्यास ।
तुझ्याविना नको मज काही
आहेस तुच माझा एक श्वास ।
Sanjay Ronghe