Tuesday, August 13, 2024

अविस्मरणीय क्षण

एकेक क्षण या जीवनाचा
अविस्मरणीय मज वाटे ।
खडतर होता प्रवास सारा
कुठे पाकळ्या तर कुठे काटे ।

हसणे रडणेही सोबत होते
सुख दुःख होते जरी छोटे ।
आसवांनी भरले डोळे
त्यातही सुख वाटे मोठे ।

मन होते मज सावराया
हुंदका ही आतच दाटे ।
दिवस असे हे कधी सरले
वाटते सारे खोटे खोटे ।
Sanjay R.


Tuesday, August 6, 2024

महादेव

आता असतो मलाही
सोमवारचा उपवास ।
कारण आहे एकच
सुरू झाला श्रावण मास ।

बेल फुल घेऊन अक्षदा
महादेवाचे करतो पूजन ।
आजकाल पूजेतच हो
जरा लागते माझेही मन ।

रोज असते सायंकाळी
मंदिराची एक वारी ।
मनोभावे हात जुळतात
देवच वाटतो मला प्रहरी ।
Sanjay R.


Saturday, August 3, 2024

दुःख

दुःखा मागे येयील सुख
मनात कशाची रुखरुख ।
हसरे गोजरे सुंदर हे मुख
होईल खराब चांगला लूक ।
झाले गेले विसर तू आता
असू देना तू कुणाचीही चूक।
जरा विचार कर थोडा
तुटेल नाते होशील मुक ।
Sanjay R.


Thursday, August 1, 2024

श्रावण सरी

कुठे कशास मी जाऊ
मागे पावसाच्या धावू ।
येतो आणि जातो तो
श्रावण सरींचा खाऊ ।

पाऊस पडतो सर सर
निळे काळे इथे अंबर ।
ऊन पावसाचा खेळ
सूर्य वाटते मज झुंबर ।

हिरव्या पानांची सळसळ 
जिकडे तिकडे हिरवळ ।
फुलला गुलाब मोगरा
मोहवितो कसा दरवळ ।

निसर्ग मोहक इतका की
आवडतो श्रावण जितका ।
जातो लवून माया मज
आनंद उत्साह मनी तितका ।
Sanjay R.

Wednesday, July 24, 2024

मन

मन किती हे भारी
कधी अंतरात कधी ते दारी ।
कधी हिरमुसते
कधी येई फिरून दिशा चारी ।

सुख असो वा दुःख
आतल्या आत चाले मारा मारी ।
क्षणात सारून सारे
भाव बदलाची करे कशी हुशारी ।

संकटाचे येता वादळ
सहजच कसे ते होते  विचारी ।
शांती वाटे हवी तेव्हा
होते संथ किती ते  निराकरी ।
Sanjay R.