Thursday, June 20, 2024

गैर समज

समज वा नासमज
सगळाच गैर समज ।
समजवायचे किती
असो वा नसो गरज ।

तुटलेले हे मन असे
जुळेल का खरंच ।
धाग्याला धागा जुळतो
स्वच्छ असे मन तरच ।

नको राग नको लोभ
मोह माया ठेवा दूरच ।
मनाशी मन जुळवा
मी मी सोडाल तरच ।
Sanjay R.




Wednesday, June 19, 2024

अधीर हे मन

अधीर किती हे मन
थांबेना एकही क्षण ।
सदा आस कशाची
अनमोल कुठले धन ।
Sanjay R.

पाणी

नभात शोधतो मी
थेंब दोन पाण्याचे ।
आले आसवे डोळ्यात
संदर्भ तेच जीवनाचे ।
Sanjay R.

अबोली

अबोली असो वा मोगरा
खुलतो केसात गजरा ।
बघतो डोळ्यात जेव्हा
चेहरा तुझाच लाजरा ।
Sanjay R.

Tuesday, June 18, 2024

भाव भक्ती

भाव भक्तीचा मार्ग
नेईल तिथेच स्वर्ग ।
मिटून दोन डोळे
चरणी लीन होतो ।

रूप तुझे आठवतो
मनी मी साठवतो ।
न उरते आशा मग
धन्य मनात होतो ।

राग लोभ मत्सर
सारेच ते दुराचार ।
लोप होतो तयाचा
भार सारा सरतो ।

दीन दुःखी गरीब
सारे माझ्या करीब ।
मीही दास प्रभूचा
भाव भक्तीत पाहतो
Sanjay R.