Monday, June 17, 2024

अपेक्षा

अपेक्षांचं ओझं पाठी
पाठ गेली ही झुकून ।
चालायचे म्हणून चालतो
श्वासही गेलेत थकून ।

तुझा तो अधिकार
मला वाटतो आधार ।
दे सोडून सारेच आता
ठेवू नकोस तू भार ।

प्रेमात तुझ्या मी ही
खाल्ल्या किती खस्ता ।
दोष तो तुझा नाहीच
पण दाखवलास रस्ता ।
Sanjay R.


वेदना

मनाची ती वेदना
कळते या मनाला ।
ओठ हे मुक जरी 
अश्रू येती नेत्राला ।
Sanjay R.

नशीब

नको दोष नशिबाला
प्रीत हृदयात फुलते ।
मनाला मन जुळता
अंतरातही ते झुलते ।
Sanjay R.

Sunday, June 16, 2024

भावनांचा खेळ

भाव भावनांचा हा खेळ
त्याला बंध जरी गुलाबी ।
सुख दुःखाच्या तिथे गाठी
होऊ दे मन थोडे शराबी ।
Sanjay R.

Saturday, June 15, 2024

बरसू दे सर आता

बरसू दे ना सर आता
येऊ दे पाऊस जोरात ।
घामाने या भिजलो चीप्प
भिजावे वाटते पावसात ।

झाडांची पाने गळली
गवत झुडपे कशी वाळली ।
ऊन गर्मी म्हणते मी
उन्हापाई वाचा वळली ।

एसी कुलर सारे थकले
विहीर नाले किती सुकले ।
निसर्गाने टाकली मान
मोठमोठे वृक्ष ही झुकले ।

येरे येरे पावसा आता
भिजू दे ना काळी माती ।
पेरलेले रुजेल तेव्हा
पिकेल रे आमची शेती ।

चार पैसे येतील पदरी
मिटेल हा भुकेचा ध्यास ।
दर वर्षी तर तुझ्यावरच
शेतकऱ्याची असते आस ।

संजय रोंघे, नागपूर.
मोबाईल - 8380074730