Thursday, May 30, 2024

बाप माय

कशास रे तू करतो दुःख
क्षण सुखाचे जातील वाया ।

आई बापा विना इथे रे
करतोच कोण इतकी माया ।

माय माऊली ती मायेची
बाप घराची बनतो छाया ।

माय होते जेव्हा आधार
होतो बाप कुटुंबाचा पाया ।
Sanjay R.


अंत

होतात मलाही भास
मनात आहे ध्यास ।

नसते काहीच खास
करतो मीही प्रयास ।

सोसून धरतो त्रास
असतो हवा एक घास ।

अस्वस्थ करतो वास
धरतो सत्याची कास ।

आहे कठीण हा प्रवास
सरतात शेवटी श्वास ।
Sanjay R.


Wednesday, May 29, 2024

राणी

आठवतात अजून
ती जुनी गाणी ।
त्यात असायचा
मैं राजा तू राणी ।
आजी पण सांगे
तीच कहाणी ।
सारे संपले आता
उरले का कोणी ।
जमिनीत आता
उरले कुठे पाणी ।
शब्द ही फितूर
बदलते वाणी ।
विसरलो साऱ्या
पुस्तकातल्या म्हणी ।
एक पैसा दोन पैसा
दिसत नाही नाणी ।
सारेच तर म्हणतात
लयच तू शहाणी ।
Sanjay R.

Tuesday, May 28, 2024

वाट

प्रत्येक वाट इथली
दुःखाने आहे भरली ।
सुख असेच कसे मिळेल
कित्तेक माणसं हरली ।
इती पासून अंता पर्यंत
थेंब थेंब घागर भरली ।
क्षण शेवटचा येताच
सोबत तीही सरली ।
Sanjay R.


Sunday, May 26, 2024

गाव

राहिले दूर आता
होते जिथे ते गाव ।
वेळच नाही आता
घेऊ कुठे मी धाव ।

शहराचा रंगच न्यारा
चढलेले इथे भाव ।
नका बघू मनात
तिथे तर घावच घाव ।

ओळखतो कोण इथे
सांगितले कितीही नाव ।
शिकलो मीही आता
सगळेच इथले डाव ।
Sanjay R.