Tuesday, May 28, 2024

वाट

प्रत्येक वाट इथली
दुःखाने आहे भरली ।
सुख असेच कसे मिळेल
कित्तेक माणसं हरली ।
इती पासून अंता पर्यंत
थेंब थेंब घागर भरली ।
क्षण शेवटचा येताच
सोबत तीही सरली ।
Sanjay R.


Sunday, May 26, 2024

गाव

राहिले दूर आता
होते जिथे ते गाव ।
वेळच नाही आता
घेऊ कुठे मी धाव ।

शहराचा रंगच न्यारा
चढलेले इथे भाव ।
नका बघू मनात
तिथे तर घावच घाव ।

ओळखतो कोण इथे
सांगितले कितीही नाव ।
शिकलो मीही आता
सगळेच इथले डाव ।
Sanjay R.

Saturday, May 25, 2024

रेषा

कशाला मी ठेवू
कशाची इथे आशा ।
आधीच ओढल्यास
बंधनाच्या तू रेषा ।

गोड असो वा कडू
इथे एकच भाषा ।

निष्पन्न तोच त्यातून
उरते फक्त निराशा ।

जावे कुठे कळेना
समोर तर दश दिशा ।
लोटातील हेही दिवस
गुंडाळणार नाही गाशा ।
Sanjay R.


Friday, May 24, 2024

पात्र

सरतो जेव्हा दिवस
होतेच ना रात्र ।
माणसाचे ही असेच
बदलतो तो पात्र ।
Sanjay R.

बंद खिडकी

आला भरून क्षणात
पापण्यांचा काठ ।
बंद खिडकीतले मन
अंतरात वाहे लाट ।

जन्म भराची ही साथ
सोडू कशी गाठ ।
निरंतर आहे चालायची
काटेरी हीच वाट ।

सुख दुःखाच्या इथे सरी
झुळझुळ वाहे पाट ।
लोप क्षणात पावते सारे
होते पुन्हा एक पहाट ।
Sanjay R.