आला भरून क्षणात
पापण्यांचा काठ ।
बंद खिडकीतले मन
अंतरात वाहे लाट ।
जन्म भराची ही साथ
सोडू कशी गाठ ।
निरंतर आहे चालायची
काटेरी हीच वाट ।
सुख दुःखाच्या इथे सरी
झुळझुळ वाहे पाट ।
लोप क्षणात पावते सारे
होते पुन्हा एक पहाट ।
Sanjay R.
आला भरून क्षणात
पापण्यांचा काठ ।
बंद खिडकीतले मन
अंतरात वाहे लाट ।
जन्म भराची ही साथ
सोडू कशी गाठ ।
निरंतर आहे चालायची
काटेरी हीच वाट ।
सुख दुःखाच्या इथे सरी
झुळझुळ वाहे पाट ।
लोप क्षणात पावते सारे
होते पुन्हा एक पहाट ।
Sanjay R.
नजर तुझी अशी की
वाट मी पाहतो सारखी ।
कधी येते नी कधी जाते
मनात एक आस सारखी ।
लागेना डोळ्यास डोळा
येते याद तुझीच सारखी ।
असे क्षणाचीच ती भेट
हवी नजरानजर सारखी ।
का गुंतले मन हे तुझ्यात
असावी तू पुढ्यात सारखी ।
अबोल असू दे तुझी वाचा
नजरेचा आहे मी पारखी ।
Sanjay R.
उरलेत किती त्यांचे
सांग तूच आता श्वास ।
त्यांच्याही मनात आहे
अजून जगण्याची आस ।
रोजच बघतात स्वप्न
मनातही होतात भास ।
नकळत ते सारे सरले
जे होते तेव्हा खास ।
क्षण शेवटाचे आलेत
कुठे कशाचे प्रयास ।
आता तर लागला
फक्त अंताचा ध्यास ।
म्हातारपण कठीण किती
सोसावाच लागतो त्रास ।
मनात कुठली आशा
जगायला हवा एक घास ।
Sanjay R.
अशी कशी ही झाली सकाळ
सूर्य दिसेना वरती आभाळ ।
गार वारा झुलतो कसा
जणू वादळाचं ते छोटं बाळ ।
Sanjay R.