Thursday, April 27, 2023

विचारांचे जाळे

डोक्यात विचारांचे जाळे
छळतात किती मनाला ।
सारे असते सोसायचे
सांगायचे कसे कुणाला ।

वाटे कधी काय करावे
दुःख आतले कसे सारावे ।
सोडून साऱ्या दुःखाच्या वाटा
वाटेत सुख तेच धरावे ।
Sanjay R.


सुंदर मनाची असते आई

सुंदर मनाची असते आई
करते लहान पणी गाई गाई ।
जगात असते रात्र सारी
तानुल्या रे ती तुझ्या पाई ।

कंटाळा का कधी केला तिने
मन तिचे रे तुझ्याच ठाई ।
ओठी तिच्या नव्हता शब्द
कधी बोलली का तुला नाही ।

मोठा तू रे झालास आता
आठव जरा ती तुझी आई ।
लोटू नकोस दूर असे तू
सांग कशाची पडली घाई ।
Sanjay R.


Wednesday, April 26, 2023

एक सुंदर मन

असावे एक सुंदर मन
गुंतून जावा क्षण क्षण ।
कधी घ्यावी उंच भरारी
यावे फिरून सारे गगन ।
आहे बघायचे सुंदर तारे
ठेवून उघडे दोन नयन ।
ढगावरती होऊन स्वार
आहे करायचे मज भ्रमण ।
Sanjay R.



नियती पुढे सारे क्षीण

मनातले कळणे
आहे किती कठीण ।
व्हायचे तेच घडते
नियती पुढे सारे क्षीण ।

हाताशी आलेला घास
जातो कधी निसटून ।
नकळत मिळते कधी
नशीब आणते ओढून ।

सारा नियतीचा खेळ
नशिबाची हवी साथ ।
असेच काही मिळत नाही
मेहनतीचाही हवा हात ।
Sanjay R.


नियतीचा खेळ सारा

चालते कुणाचे इथे
नियतीचा खेळ सारा ।
हसतो रडतो कुणी कसा
ठरवितो तोच वारा ।
Sanjay R.